महिलांचे आतापर्यंत 13 वनडे वर्ल्डकप झाले आहे. मात्र ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यापैकी एकही संघ फायनलमध्ये नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आज महिला क्रिकेट विश्वाला वनडेत नवा चॅम्पियन मिळणार आहे. भारत आणि द.आफ्रिकेने आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही.
भारताची प्लेइंग इलेव्हन
शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष, अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरिणी, रेणुका सिंग ठाकूर
advertisement
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन
लॉरा वॉलवार्ट (कर्णधार), टाझमिन ब्रिट्स, अनाके बॉश, सुन लुस, मरिझेन कॅप्प, सिनालो जाफ्ता, एनारि डेर्कसेन, च्लोइ ट्रायन, नदिने डे क्लार्क, अयाबोंगा खाका, नोनक्लुलेको म्लाबा
तुम्हाला माहिती आहे का?
- स्मृती मानधनाला वर्ल्डकपमध्ये १००० धावा पूर्ण ५२ धावांची गरज आहे. अशी कामगिरी करणारी ती १०वी महिला आणि दुसरी भारतीय खेळाडू ठरेल.
- महिलांच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप-३ मध्ये स्थान मिळवण्यासाठी लॉरा वोल्वार्डला आणखी ७३ धावांची आवश्यकता आहे.
- ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड यापैकी कोणीही नसलेला हा पहिलाच वनडे वर्ल्डकप फायनल असेल.
भारताचा वर्ल्डकपमधील प्रवास
श्रीलंकेविरुद्ध ५९ धावांनी विजय
पाकिस्तानविरुद्ध ८८ धावांनी विजय
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ विकेटनी पराभव
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ विकेटनी पराभव
इंग्लंडविरुद्ध ४ धावांनी पराभव
न्यूझीलंडविरुद्ध ५३ धावांनी विजय
बांगलादेशविरुद्धची लढत पावसामुळे रद्द
सेमीफायनल-ऑस्ट्रोलियाविरुद्ध ५ विकेटनी विजय
दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्डकपमधील प्रवास
इंग्लंडविरुद्ध १० विकेटनी पराभव
न्यूझीलंडविरुद्ध ६ विकेटनी विजय
भारताविरुद्ध ३ विकेटनी विजय
बांगलादेशविरुद्ध ३ विकेटनी विजय
श्रीलंकेविरुद्ध १० विकेटनी विजय
पाकिस्तानविरुद्ध १५० धावांनी विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ विकेटनी पराभव
सेमीफायनल- इंग्लंडविरुद्ध १२५ धावांनी विजय
