भारताकडून श्री चरिणी आणि दीप्ती शर्मा यांना 2-2 विकेट मिळाल्या. तर क्रांती गौड, अमनजोत कौर आणि राधा यादव यांना एक-एक विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात विजय मिळवणारी टीम फायनलला पोहोचेल. फायनलमध्ये विजेत्या टीमचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला होता.
advertisement
याआधी ग्रुप स्टेजला झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. तसंच या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही, त्यामुळे भारताला हा सामना जिंकण्यासाठी इतिहास घडवावा लागणार आहे. स्पर्धेमध्ये टीम इंडियाची कामगिरी म्हणावी तशी चांगली झालेली नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला, त्यामुळे सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी टीम इंडिया चौथी टीम ठरली. आता सेमी फायनलमध्ये विजय मिळवण्यासाठी भारताला स्मृती मंधना आणि हरमनप्रीत कौर यांच्या बॅटिंगवर अवलंबून राहावं लागणार आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन
शफाली वर्मा, स्मृती मंधना, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरिणी, रेणुका सिंग ठाकूर
