प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना यांच्या शतकांच्या जोरावर भारताने 340 रनपर्यंत मजल मारली. प्रतिकाने 122 तर स्मृतीने 109 रनची खेळी केली. या दोघांमध्ये 212 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. तर जेमिमा रॉड्रिग्जने 55 बॉलमध्ये 76 रन केले. पावसामुळे टीम इंडियाला 49 ओव्हरच बॅटिंग करण्यात आली, ज्यात त्यांनी 3 विकेट गमावून 340 रन केल्या. यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडला 44 ओव्हरमध्ये 325 रनचं आव्हान मिळालं.
advertisement
भारताकडून रेणुका सिंग ठाकूर आणि क्रांती गौड यांना 2-2 विकेट मिळाल्या. याशिवाय स्नेह राणा, श्री चरणी, दीप्ती शर्मा आणि प्रतिका रावल यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडकडून ब्रुक हलिडेने सर्वाधिक 81 रन केले, तर इसाबेला गेझने 65 रनची खेळी केली.
टीम इंडिया सेमी फायनलमध्ये
न्यूझीलंडला पराभूत करून टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे, पण टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमधला आणखी एक सामना शिल्लक आहे. 26 ऑक्टोबरला भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. सेमी फायनलआधी या सामन्यात चुका सुधारण्याची टीम इंडियाकडे संधी आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तीन टीम आधीच सेमी फायनलला क्वालिफाय झाल्या होत्या, त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथ्या स्थानासाठी स्पर्धा होती. आता न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर भारत वर्ल्ड कप सेमी फायनलला पोहोचणारी चौथी टीम ठरली आहे.