TRENDING:

IND vs AUS : भारताचा क्रिकेट इतिहासातला सगळ्यात मोठा विजय, मुंबईच्या जेमिमाने घेतला ऑस्ट्रेलियाचा बदला!

Last Updated:

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा रोमांचक विजय झाला आहे. जेमिमा रॉड्रिग्जचं वादळी शतक आणि कर्णधार हरमनप्रीतच्या 89 रनच्या खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचं 339 रनचं आव्हान पार केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा रोमांचक विजय झाला आहे. जेमिमा रॉड्रिग्जचं वादळी शतक आणि कर्णधार हरमनप्रीतच्या 89 रनच्या खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचं 339 रनचं आव्हान पार केलं. महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. याआधी ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता, पण या पराभवाचा बदला भारताने सेमी फायनलमध्ये घेतला आहे.
भारताचा क्रिकेट इतिहासातला सगळ्यात मोठा विजय, मुंबईच्या जेमिमाने घेतला ऑस्ट्रेलियाचा बदला!
भारताचा क्रिकेट इतिहासातला सगळ्यात मोठा विजय, मुंबईच्या जेमिमाने घेतला ऑस्ट्रेलियाचा बदला!
advertisement

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. वर्ल्ड कपमधली पहिलीच मॅच खेळणारी शफाली वर्मा 5 बॉलमध्ये 10 रन करून आऊट झाली. यानंतर जेमिमाने स्मृती मंधानाच्या साथीने ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर आक्रमण केलं, पण स्मृतीला वादग्रस्त आऊट दिलं गेलं. यानंतर जेमिमाने हरमनप्रीतसोबत 167 रनची पार्टनरशीप केली.

ऑस्ट्रेलियाचा मोठा स्कोअर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वतःवर विश्वास ठेवला अन् स्वप्न साकार झालं, शेतकऱ्याच्या मुलगा झाला DYSP, Video
सर्व पहा

पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा 49.5 ओव्हरमध्ये 338 रनवर ऑलआऊट झाला आहे. फोबे लिचफिल्डने 93 बॉलमध्ये 119 रनची खेळी केली, तर एलिस पेरीने 77 आणि ऍशलेघ गार्डनरने 63 रन केले, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : भारताचा क्रिकेट इतिहासातला सगळ्यात मोठा विजय, मुंबईच्या जेमिमाने घेतला ऑस्ट्रेलियाचा बदला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल