ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मॅच जिंकवणाऱ्या खेळीनंतर जेमिमा भावुक झाली. आज मला खूप भीती वाटत होती. मला टीममधून काढलं गेलं होतं, संपूर्ण स्पर्धेत मी रोज रडायचे, पण देवाने मला पुढे नेलं, असं जेमिमा म्हणाली आहे.
काय म्हणाली जेमिमा?
'सगळ्यात आधी मी येशूचे आभार मानते, कारण मी हे स्वतः करू शकले नाही. त्याने मला आज साथ दिली. मी माझ्या आईचे, वडिलांचे, माझ्या प्रशिक्षकाचे आणि या काळात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानते. मागचे चार महिने खूप कठीण होते, पण हे स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही. मी पाचव्या क्रमांकावरच बॅटिंगला जाणार होते, यानंतर मी अंघोळीला गेले. तेव्हा तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्याचा निर्णय झाला. टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी मला तिथे राहणं गरजेचं होतं. आजचा दिवस 50 किंवा 100 रनबद्दल नव्हता, तर भारताला जिंकवण्याबद्दल होता, म्हणून मी शतकानंतर सेलिब्रेशन केलं नाही. टीममधल्या प्रत्येकाने मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे, मी एकटी या सगळ्याचं श्रेय घेऊ शकत नाही. नवी मुंबई कायमच माझ्यासाठी खास राहिलं आहे, यापेक्षा चांगला निर्णय आला नसता. ज्यांनी टीमसाठी जल्लोष केला, त्या सगळ्यांचे आभार मी मानते', असं वक्तव्य जेमिमाने केलं आहे.
advertisement
