दक्षिण आफ्रिकेच्या नदिने डे क्लर्कचा कॅच हरमनप्रीतने दीप्ती शर्माच्या बॉलिंगवर पकडला आणि टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली ही फायनल पाहण्यासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता. शेवटचा कॅच पकडण्यासाठी हरमनप्रीत धावली तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेला रोहित शर्मा त्याच्या जागेवरून उठला आणि त्याने आकाशाकडे पाहिलं. टीम इंडिया चॅम्पियन झाल्याचं कळताच रोहितनेही कोट्यवधी भारतीय चाहत्यांप्रमाणेच एकच जल्लोष केला.
advertisement
दीप्ती शर्मा भारताच्या या विजयाची शिल्पकार ठरली. आधी बॅटिंग करताना दीप्तीने 58 बॉलमध्ये 58 रनची खेळी केली, यानंतर तिने बॉलिंगमध्येही धमाका केला. 9.3 ओव्हरमध्ये 39 रन देऊन तिने 5 विकेट घेतल्या. दीप्ती शर्माशिवाय शफाली वर्मानेही उत्कृष्ट कामगिरी केली. ओपनिंगला बॅटिंगला आलेल्या शफालीने 87 रनची मॅच विनिंग खेळी केली, त्यानंतर तिने 2 विकेटही घेतल्या. या कामगिरीबद्दल तिला शफालीला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वॉलवार्डटने 98 बॉलमध्ये 101 रन केले, पण लॉराशिवाय कोणत्याच खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.
दीप्ती शर्माला प्लेअर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. दीप्तीने या वर्ल्ड कपच्या 7 इनिंगमध्ये 215 रन केल्या. ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. याचसोबत दीप्तीने वर्ल्ड कपमध्ये 22 विकेट घेतल्या. दीप्ती शर्मा स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू ठरली. एका वनडे वर्ल्ड कपमध्ये 200 पेक्षा जास्त रन करणारी आणि 15 विकेट घेणारी दीप्ती शर्मा पहिली खेळाडू ठरली आहे.
