दिल्लीकडून मरिझेन कॅप आणि नंदनी शर्माला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. स्मृती मानधना शतक पूर्ण करेल असं वाटत होतं, पण नंदनी शर्माने तिला 96 रनवर आऊट केलं. या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि त्यानंतर दिल्लीचा 20 ओव्हरमध्ये 166 रनवर ऑलआऊट केला. शफाली वर्माने 41 बॉलमध्ये 62 रन केले, पण दिल्लीची बॅटिंग गडगडली. आठव्या क्रमांकावर आलेल्या स्नेह राणाने 22 आणि नवव्या क्रमांकावर बॅटिंग केलेल्या लुसी हॅमिल्टनने 19 बॉलमध्ये 36 रनची खेळी केली.
advertisement
आरसीबीकडून लॉरेन बेल आणि सायली सतघरे यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या. प्रेमा रावतने 2 आणि नदिने डे क्लार्कने 1 विकेट घेतली.
आरसीबीचा चौथा विजय
डब्ल्यूपीएलच्या यंदाच्या मोसमातला आरसीबीचा 4 सामन्यांमधला हा चौथा विजय आहे, त्यामुळे 8 पॉईंट्ससह आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या मोसमात आरसीबीचे आणखी 4 सामने शिल्लक आहेत, त्यामुळे आरसीबीचं प्ले-ऑफला पोहोचणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. यंदाच्या डब्ल्यूपीएलमधला नवी मुंबईच्या स्टेडियमवरचा हा शेवटचा सामना होता, आता उरलेले सगळे सामने बडोद्यामध्ये खेळवले जाणार आहेत.
