युसूफ पठाण परदेशी जाणार नाही
शिष्टमंडळासोबत जाण्यास नकार देणारा मुस्लिम नेता दुसरा तिसरा कुणी नसून स्टार क्रिकेटर आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाणचं नाव देखील सामील होतं. मात्र, आता युसूफ पठाण परदेशी जाणार नाही, अशी माहिती आली आहे. युसूफ पठाणने शिष्टमंडळात सामील होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
युसूफ पठाणशी संपर्क साधला पण...
पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांच्या गटात युसूफ पठाण यांचा समावेश केला जाणार नाही. भारत सरकारने थेट खासदार युसूफ पठाण यांच्याशी संपर्क साधला होता. खासदारांच्या शिष्टमंडळात युसूफ पठाण यांचे नाव समाविष्ट करण्यापूर्वी तृणमूल काँग्रेसशी कोणताही सल्लामसलत झाली नव्हती. भारत सरकारने थेट युसूफ पठाणशी संपर्क साधला होता आणि आता पठाणने भारत सरकारला कळवले आहे की तो शिष्टमंडळासोबत परदेशात जाण्यास उपलब्ध असणार नाही.
तृणमूल काँग्रेसने काय म्हटलं?
दरम्यान, युसूफ पठाणने परदेशी दौऱ्यात जाण्यास नकार दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे की, परराष्ट्र धोरण हा भारत सरकारचा विषय आहे. याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे. तृणमूल काँग्रेसने पुन्हा सरकारच्या पदरात चेंडू टाकला आहे.