टीम इंडियाचे ओपनर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल ऑस्ट्रेलियामधल्या गोल्ड कोस्ट बीचवर एन्जॉय करत होते, तेव्हा त्यांनी शर्टलेस फोटो शेअर केला. गिल आणि अभिषेकचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच युवराज सिंगने प्रतिक्रिया दिली.
अभिषेक शर्माने इन्स्टाग्रामवर गिलसोबतचे फोटो शेअर केले. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या, पण युवराजच्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधलं. 'जुती लावां दोना दे', असं युवराज पंजाबीमध्ये म्हणाला, ज्याचा अर्थ दोघांना चपलेने मारेन, असा आहे.
advertisement
युवराजने खरंतर ही कमेंट मस्करीमध्ये केली. युवराज हा अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलचा प्रशिक्षक आहे. या दोन्ही खेळाडूंनी लहानपणापासून युवराजकडून क्रिकेटचे धडे गिरवले. सीरिजच्या सुरूवातीपासूनच अभिषेक शर्मा आक्रमक बॅटिंग करत आहे, यातल्या एका सामन्यात अभिषेकने अर्धशतकही केलं. पण शुभमन गिलची बॅट मात्र शांत आहे. आशिया कपमधून टीम इंडियात कमबॅक केल्यानंतर गिलला एकही अर्धशतक करता आलेलं नाही.
युवराजला दोघांकडून अपेक्षा
युवराज सिंगला त्याच्या दोन्ही शिष्यांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारताला जर सीरिज जिंकायची असेल, तर गिल आणि अभिषेक या दोन्ही ओपनरना धमाकेदार सुरूवात करून द्यावी लागणार आहे.
