नियमित सर्व्हिसिंग करणे हे एसीच्या कूलिंगसाठी बेस्ट असते. वीजेचा खर्चही कमी होतो. यासोबत एसीची लाइफही वाढते. तुमच्याकडे स्प्लिट एसी असो किंवा विंडो एसी त्याची वेळो-वेळी स्वच्छता आणि तपासणी करुन घेणे हे गरजेचे ठरते.
स्प्लिट ACच्या सर्व्हिसचा खर्च
स्प्लिट AC मध्ये दोन यूनिट असतात. एक इनडोर आणि दुसरा आउटडोर. याच कारणामुळे याची सर्व्हिस थोडी किचकट आणि महाग असू शकते. सामान्यतः साधारण सर्व्हिससाठी जवळपास 500 ते 1000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. ज्यामध्ये फिल्टर आणि बेसिक स्वच्छतेचा समावेश असतो.
advertisement
इनडोर आणि आउटडोर यूनिटला जेट वॉशने डीप क्लिन केलं तर याचा खर्च जवळपास 900 ते 1500 रुपयांपर्यंत असू शकतो. कूलिंग कॉइलची स्वच्छता किंवा किरकोळ दुरुस्तीसाठी जवळपास 700 ते 1200 रुपयांपर्यंत लागू शकतात. तसंच ड्रेन पाइप स्वच्छ करण्याचा खर्च साधारण 200 ते 500 रुपयांपर्यंत येऊ शकतो.
Air Cooler Hacks: कुलर खिडकीच्या बाहेर ठेवावं की आत? कुठे मिळतो जास्त गारवा? पाहाच
AC मध्ये गॅस भरावा लागत असेल तर त्याची किंमत गॅसच्या प्रकारावर अवलंबून असते. ती जवळपास 2000 ते 3500 रुपयांदरम्यान असू शकते. अेकदा डीप सर्व्हिस पॅकेजमध्ये इनडोर यूनिटची स्वच्छता, कंडेंसर क्लीनिंग आणि गॅस चेकिंगसारख्या कामांचा समावेश असतो. ज्याचा खर्च जवळपास 2 हजार ते 2500 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
विंडो एसीची सर्व्हिस किती स्वस्त पडेल?
विंडो एसीची रचना तुलनेने साधी असते, त्यामुळे त्यांची सर्व्हिसिंग करणेही स्वस्त असते. साध्या साफसफाईसाठी सुमारे 400 ते 700 रुपये खर्च येऊ शकतो. डीप क्लिनिंगसाठी सुमारे 700 ते 1200 रुपये खर्च येऊ शकतो. कूलिंग कॉइल्स स्वच्छ करण्यासाठी सुमारे 500 ते 900 रुपये खर्च येऊ शकतो.
विंडो AC मध्ये गॅस भरण्याचा खर्च साधारण 1800 ते 3000 रुपयांपर्यंत असतो. तुम्ही पूर्ण सर्व्हिस केली, ज्यामध्ये फिल्टर, कॉइल आणि कंप्रेसरची चेकिंग समाविष्ठ असेल तर खर्च जवळपास 1500 ते 1800 रुपयांपर्यंत येऊ शकतो. ज्यामध्ये गॅस भरण्याचा समावेश आहे.
कूलर लावलाय ना? लगेच करा हे जुगाड; ACहून जास्त मिळेल कूलिंग, वीजही वाचेल
AC मध्ये गॅस भरण्याचा खर्च किती
AC ची कूलिंग कमी झाल्यावर सर्वात आधी गॅसची तपासणी करा. अनेकदा गॅस लीक होणे किंवा दीर्घकाळापर्यंत वापर केल्याने कमी होत जातो. R22 गॅस भरण्याचा खर्च हा 1800 ते 2500 रुपयांपर्यंत असू शकतो. तसंच R410A गॅससाठी जवळपास 2500 ते 3500 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. R32 गॅसची किंमत सामान्यतः 2500 ते 3800 रुपयांपर्यंत असते. एसीची क्षमता आणि मॉडलनुसार किंमत थोडी कमी-जास्त होऊ शकते.
फिल्टर स्वच्छतेचं लहान पण आवश्यक काम
एसीचं फिल्टर घराब झालं तर हवेचा प्रभाव कमी होतो. मशीनला जास्त मेहनत करावी लागते. यामुळे वीज बिलही वाढू शकते. फिल्टरचा साधारण स्वच्छता खर्च जवळपास 200 ते 400 रुपयांपर्यंत असतो. फिल्टर खराब झालं आणि ते बदलावं लागलं तर त्याची किंमत जवळपास 500 ते 1200 रुपयांपर्यंत असू शकते.
सर्वसाधारण दुरुस्तीचा खर्च किती असतो?
सर्व्हिसिंग दरम्यान, टेक्निशियन्सला अनेकदा गळती, खराब पार्ट किंवा इलेक्ट्रॉनिक समस्या यांसारख्या अतिरिक्त समस्या आढळतात. एसीचा पीसीबी (PCB) खराब झाला असेल, तर दुरुस्तीचा खर्च 2000 ते 5000 रुपयांपर्यंत असू शकतो. कॅपॅसिटर बदलण्यासाठी सुमारे 300 ते 900 रुपये खर्च येऊ शकतो. खराब झालेल्या फॅन मोटरसाठी 1500 ते 3000 रुपये खर्च येऊ शकतो. सर्वात महागडी दुरुस्ती कंप्रेसरची असते, ज्यासाठी 3000 ते 12000 रुपये खर्च येऊ शकतो. हा खर्च एसीच्या ब्रँड आणि मॉडेलवर अवलंबून असतो.
सी सर्व्हिसिंगचे जास्त पैसे द्यायचे नसतील तर नेहमी पूर्ण किंमतीची माहिती घ्या. विश्वासार्ह रिव्ह्यू असणाऱ्या टेक्निशियनला निवडा. कोणत्याही लीक शिवाय फक्त कूलिंग कमी असल्यावर गॅस भरण्यासाठी लगेच तया होऊ नका. या व्यतिरिक्त उन्हाळ्यात दर दोन-तीन आठवड्याला स्वतः फिल्टर स्वच्छ करणे फायदेशीर ठरते.
