TRENDING:

लॅपटॉपच्या किंमतीत होणार मोठी वाढ? 30 हजारांचा होऊ शकतो 45 हजारांना, पण का?

Last Updated:

2026 मध्ये लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या किंमती 35% पर्यंत वाढू शकतात. RAM आणि चपच्या वाढत्या किंमती, AI डिमांड आणि सप्लायच्या कमतरता ही मोठी कारणं आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : तुम्ही यावर्षी नवा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप खरेदी करण्याची प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला आधीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागू शकते. रिपोर्ट्सनुसार, 2026 मध्ये कंप्यूटर डिव्हाइसच्या किंमती 35 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. याचं खरं कारण कंप्यूटरचे आवश्यक कंपोनेंट्स जसं की, RAM, प्रोसेसर आणि GPU च्या किंमतीतील वेगवान वाढ सांगितली जात आहे. विशेषतः DDR RAM च्या किंमतीत मोठी वाढ आणि एंट्री-लेव्हल इंटेल प्रोसेसरच्या कमतरतेमुळे लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या खर्चात वेगाने वाढ होऊ शकते.
लॅपटॉप प्राइज
लॅपटॉप प्राइज
advertisement

मार्केट रिसर्च फर्म आयडीसीच्या मते, भारतातील पीसी बाजारपेठ, ज्यामध्ये डेस्कटॉप, नोटबुक आणि वर्कस्टेशन्सचा समावेश आहे, 2025 मध्ये आतापर्यंतचे सर्वात मजबूत वर्ष पाहिले.

2025 मधील मोठ्या पीसी बाजाराची आकडेवारी

एकूण पीसी शिपमेंट: 15.9 मिलियन यूनिट्स

वर्ष-दर-वर्ष वाढ: 10.2%

डिसेंबर तिमाही शिपमेंट: 4.1 मिलियन यूनिट्स

ब्रांड्सविषयी बोलायचं झाल्या, बाजारात HP सर्वात पुढे आहे. ज्यानंतर Lenovo, Dell, Acer आणि Asus सारखे मोठे खेळाडू आहेत. या सर्व कंपन्यांनी 2025 मध्ये शिपमेटंमध्ये वाढ नोंदवली आहे.

advertisement

YouTubeवर 1 Million व्ह्यूज आल्यावर छप्परफाड कमाई होते? पाहा कसं आहे गणित

खरंतर, वाढत्या किमतींचा परिणाम आता बाजारावर होऊ शकतो. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, रॅमच्या किमती आधीच 2.5 ते 3 पट वाढल्या आहेत, ज्यामुळे लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या किमती आतापर्यंत 10 ते 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मार्चमध्ये किमती आणखी 8 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, येत्या काही महिन्यांत आणखी 10 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.

advertisement

याचा परिणाम असा होईल की, जो लॅपटॉप पूर्वी 30 ते 35 हजार रुपयांत मिळत होते. ते आता जवळपास 45 हजार रुपयांपर्यंत पोहोचत आहेत. यामुळे विशेषतः विद्यार्थी, होम यूझर्स आणि पहिल्यांदा कंप्यूटर खरेदी करणाऱ्यांना अपग्रेड करणे कठीण होऊ शकते. विशेषज्ञांनुसार, कंपोनेंटच्या किंमती पुढील 6-7 क्वार्टरपर्यंत उंच राहू शकतात आणि 2027 च्या दुसऱ्या सहामाहीपूर्वी किमतीत दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

advertisement

AC च्या स्फोटात महिलेचा मृत्यू! जाणून घ्या ब्लास्टचे संकेत, कसा करावा बचाव

किमती का वाढत आहेत

  • DDR RAMच्या किमती गगनाला भिडत आहेत
  • एंट्री-लेव्हल इंटेल प्रोसेसरची कमतरता
  • AI इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मेमरीची वाढती मागणी
  • डॉलरमधील चढउतार आणि महागाई

पश्चिम आशियाचा तणाव आणि सप्लाय चेनवर परिणाम 

खरंतर कंपन्या ग्राहकांवर याचा परिणाम कमी करण्यासाठी अनेक पद्धती अवलंबत आहेत. कंपन्या नवीन कॉन्फिगरेशन, प्रमोशनल ऑफर आणि सोप्या फायनेंसिंग स्किमसारखे ऑप्शन देत आहेत. जेणेकरुन डिमांड कायम राहील. तरीही मार्केट एक्सपर्ट्स मानतात की, 2026 च्या अखेरपर्यंत PC आणि लॅपटॉपची एकूण शिपमेंटमध्ये 7-8 टक्के घसरण होऊ शकते. कारण वाढत्या किंमती खरेदीदारांना रोखू शकतात.

advertisement

ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे संस्थापक कैलाश लख्यानी म्हणतात की, नोव्हेंबरपासून लॅपटॉपच्या किमती सातत्याने वाढत आहेत. मेमरीचा खर्च, डॉलरचे चढउतार, महागाई आणि पश्चिम आशियातील संघर्ष यासारखे घटक या ट्रेंडला पुढे नेत असतील. ते असेही म्हणतात की काही प्रकरणांमध्ये, राखाडी आणि काळ्या बाजारातील क्रियाकलापांमुळे असेंबल केलेल्या संगणकांच्या किमती अत्यधिक वाढल्या जात आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या शेतात लावलं 'पैशाचं पीक', 3 वर्षे नो टेन्शन, फक्त तोडायचं अन् विकायचं, कमाई किती? Video
सर्व पहा

एक्सपर्ट्स मानतात की, तुम्ही नवीन लॅपटॉप किंवा डेस्कटॉप खरेदी करण्याचा प्लॅनिंग करत असाल तर सध्या बेस्ट वेळ ठरु शकते. कारण येत्या महिन्यात किंमती आणखी वाढू शकतात.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
लॅपटॉपच्या किंमतीत होणार मोठी वाढ? 30 हजारांचा होऊ शकतो 45 हजारांना, पण का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल