TRENDING:

सुपरफास्ट चालेल तुमचा Smartphone! फक्त या ट्रिक्स करा फॉलो

Last Updated:

How to fix phone hanging problem: सध्याच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. मात्र अनेकदा स्मार्टफोन स्लो चालतो. अशावेळी खूप चिडचिड होते. पण फोन सुपरफास्ट चालवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत. त्या फॉलो केल्यास तुम्हाला फायदा होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
How to fix phone hanging problem: तुमच्या स्मार्टफोनला दररोज वेगवेगळ्या ॲप्स, फोटो, व्हिडिओंचा सामना करावा लागतो. तुमच्या फोनमध्ये जंक फाईल्स साठवणाऱ्या बऱ्याच वेगवेगळ्या ऑनलाइन ॲक्टिव्हिटीजचेही तुम्हाला व्यसन लागले आहे. यामुळे तुमचा स्मार्टफोन स्लो चालू लागतो. तसेच, अनेक वेळा तो अजिबात रिस्पॉन्ड देत नाही. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे फोनमध्ये समाविष्ट असलेल्या अनावश्यक फाईल्स, डाउनलोड्स आणि कॅशेमुळे फोन स्लो होतो. फोनमधील कोणती सेटिंग्ज करून तुम्ही फोन फास्ट करू शकता चला पाहूया.
स्मार्टफोन
स्मार्टफोन
advertisement

खरंतर, विंडोज सिस्टीमप्रमाणे, अँड्रॉइडकडे स्वतःचा Recycle Bin नाही. या Recycle Bin मध्ये तुम्ही फोनमध्ये सामिल असलेल्या सर्व गोष्टी हटवता आणि साठवता. हे तुमच्या फोनमधून कचरा सारख्या निरुपयोगी गोष्टी काढून टाकते. अनेक स्मार्टफोन्सची स्वतःची ट्रॅश सिस्टम असते, ज्याच्या मदतीने तुम्ही फोनमध्ये समाविष्ट असलेल्या निरुपयोगी डाउनलोड्स आणि कॅशे फाइल्स हटवता. आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही ॲप्सच्या कॅशेपासून, ॲप्सच्या डेटा फाइल्सपासून या सर्व गोष्टींपासून सुटका मिळवू शकता. लक्षात ठेवा, या स्टेप्स तुमच्या Android डिव्हाइसवर वेगळ्या पद्धतीने काम करतात.

advertisement

Tech Tips: आठवड्यातून एकदा फोन बंद करण्याचे अनेक फायदे! 90% लोकांना माहितीच नाही

अँड्रॉइड स्मार्टफोनमधील Photos Trash कसा रिकामा करायचा

- सर्वप्रथम अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये Google Photos ॲप उघडा.

- आता खाली दिलेल्या लायब्ररी ऑप्शनवर जा.

- आता Library मध्ये दिलेल्या Trash ऑप्शनवर क्लिक करा.

- यानंतर उजव्या कोपऱ्यात तीन डॉट्सचा ऑप्शन दिसेल.

advertisement

- आता 'Empty Trash' चा पर्याय निवडा.

- आता ते तुम्हाला Allow ऑप्शन निवडण्यास सांगेल.

- अनुमती देऊन, तुमच्या Android स्मार्टफोनचे Google Photos कायमचे हटवले जातील.

अँड्रॉइड स्मार्टफोन वरून गुगल फाईल्स कसे साफ करावे

- तुम्ही फाइल मॅनेजरमध्ये Google च्या फाइल्स वापरत आहात? तुम्ही येथूनही Trash क्लिअर करू शकता. येथे, तुमच्या फोनमधील Google App फाइल उघडा.

advertisement

- आता टॉप-लेफ्ट कॉर्नरवर दिलेल्या Hamberger Menu वर क्लिक करा.

- तेथे Trash ऑप्शन सिलेक्ट करा. हे तुम्हाला डिलिटेड फाइल्स दाखवेल.

- तुम्ही All items अंतर्गत सर्व फाइल्स सिलेक्ट करु शकता.

- आता खाली डिलीट ऑप्शनवर क्लिक करा.

आता Instagram सांगेल तुमच्या Reels व्हायरल होणार की नाही, सोपं होईल काम

advertisement

अँड्रॉइड ॲपच्या कॅशे आणि डेटा फाइल्स कशा हटवायच्या

- सर्वात आधी फोनच्या सेटिंगमध्ये जा.

- आता सेटिंग्जमध्ये स्टोरेज शोधा. हे एकतर ॲपमध्ये किंवा इतरत्र दिसेल.

- आता ज्या ॲप्सची कॅशे तुम्हाला हटवायची आहे त्यावर क्लिक करा.

- लक्षात ठेवा, ॲपच्या फीचरमध्ये अॅक्सेस करण्यासाठी तुम्हाला स्टोरेजवर टॅप करावे लागेल.

- आता Clear Cache Button वर क्लिक करा. यामुळे तुमचा डेटा पूर्णपणे साफ होणार नाही.

- सर्वकाही साफ करण्यासाठी तुम्हाला क्लिअर स्टोरेज किंवा क्लिअर डेटावर टॅप करावे लागेल.

Android यूझर्स लक्ष द्या यामुळे तुमची सर्व सेटिंग्ज, फाइल्स आणि अकाउंट सर्व रिमूव्ह करेल.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
सुपरफास्ट चालेल तुमचा Smartphone! फक्त या ट्रिक्स करा फॉलो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल