असंच काहीसं सध्याच्या Apple iOS 26 अपडेट मध्ये होतं, या अपडेटमध्ये फोन स्लो झाल्याचा, बॅटरी लवकर संपत असल्याची अनेक युजर्सने तक्रार केली आहे. पण हे खरंच होत आहे का? आणि होत असेल तर काय उपाय आहेत किंवा युजर्सने काय करायला पाहिजे? चला जाणून घेऊ.
ॲपलने अलीकडेच iOS ची नवी आवृत्ती रिलीज केली आहे. पण काही युजर्सना या अपडेटनंतर मोबाईलमध्ये परफॉर्मन्सशी संबंधित त्रास, काही बग्ज आणि लहानसहान समस्या जाणवत आहेत. यावर उपाय म्हणून कंपनी लवकरच एक छोटं अपडेट (कदाचित iOS 26.1) आणण्याची शक्यता आहे.
advertisement
काय मिळणार पुढच्या अपडेटमध्ये?
हे छोटं अपडेट मुख्यतः बग फिक्स आणि परफॉर्मन्स सुधारणा यासाठी असणार आहे. म्हणजेच मोबाईलच्या गतीत सुधारणा होईल, लहान चुका दुरुस्त केल्या जातील आणि युजर्सचा अनुभव अधिक चांगला होईल.
किती दिवसांची वाट पाहावी लागणार?
ॲपल साधारणपणे मोठ्या अपडेटनंतर काही आठवड्यांतच फॉलो-अप अपडेट रिलीज करतं. त्यामुळे युजर्सना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. लवकरच नवं पॅच अपडेट येण्याची शक्यता आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर, सध्याचे बग्ज आणि त्रास तात्पुरते आहेत. पुढच्या छोट्या अपडेटनंतर आयफोनचा अनुभव पुन्हा एकदा स्मूथ आणि बिनचूक होईल.