Iphone स्लो झालाय आणि बॅटरी ड्रेन? मग iOS 26 वरून iOS 18.6.2 ला फोन करा डाउनग्रेड, ही पद्धत स्टेप बाय स्टेप करा फॉलो
- Published by:Devika Shinde
Last Updated:
त्यामुळे जर कोणी iOS 26 वापरून समाधानी नसेल, तर अजूनही जुन्या आवृत्तीवर म्हणजेच iOS 18.6.2 वर डाउनग्रेड करण्याची संधी आहे. चला तर मग पाहूया, डाउनग्रेड कसं करायचं.
मुंबई : मोबाईल अपडेट्स आपल्या फोनसाठी खूप महत्त्वाचे असतात. कारण त्यातून नवीन फीचर्स मिळतात, सुरक्षा वाढते आणि डिव्हाइसची परफॉर्मन्सही सुधारते. पण काही वेळा हेच अपडेट्स युजर्ससाठी डोकेदुखी ठरतात. आयफोन युजर्सना सध्या तसाच अनुभव येतोय. ॲपलने अलीकडेच iOS 26 रिलीज केलं, पण या अपडेटनंतर अनेकांना फोन स्लो होणे, बॅटरी झपाट्याने कमी होणे आणि काही छोटे-मोठे बग्ज जाणवू लागले आहेत.
ॲपलचे सुरुवातीचे अपडेट्स सामान्यतः बग्जसह येतात आणि नवीन लिक्विड ग्लास इंटरफेस स्वीकारायला युजर्सना थोडा वेळ लागतो. शिवाय लोक बॅटरी लवकर उतरण्याच्या समस्येनं त्रस्त आहेत. त्यामुळे लोकांना आता अनेकांना आपल्या फोनचा पूर्वीचा वर्जनच बरा वाटू लागला आहे. पण तो अनेकांना कसा करायचा हे माहित नाही. काळजी करु नका आम्ही त्यासाठी सोपी ट्रीक सांगणार आहेत.
advertisement
त्यामुळे जर कोणी iOS 26 वापरून समाधानी नसेल, तर अजूनही जुन्या आवृत्तीवर म्हणजेच iOS 18.6.2 वर डाउनग्रेड करण्याची संधी आहे. चला तर मग पाहूया, डाउनग्रेड कसं करायचं.
iOS 26 वरून iOS 18.6.2 मध्ये डाउनग्रेड कसं कराल?
डेटा बॅकअप घ्या – सर्वात आधी तुमच्या आयफोनचा डेटा iCloud, Mac (Finder) किंवा Windows (iTunes) वर बॅकअप करून ठेवा. अधिक सुरक्षिततेसाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी बॅकअप घ्या.
advertisement
Find My iPhone बंद करा – सेटिंग्ज > तुमचं नाव > Find My > Find My iPhone येथे जाऊन हा ऑप्शन ऑफ करा. ॲक्टिव्हेशन लॉक टाळण्यासाठी Apple ID वरून साइन-आऊट करणेही चांगले.
योग्य IPSW फाइल डाउनलोड करा – Apple च्या अधिकृत सर्व्हरवरून किंवा IPSW.me वरून तुमच्या iPhone मॉडेलसाठी योग्य iOS 18.6.2 IPSW फाइल डाउनलोड करा. ती फाइल अजून साइन होत आहे का हे तपासा.
advertisement
फोन कॉम्प्युटरला जोडा – USB-C किंवा लाइटनिंग केबलद्वारे तुमचा iPhone Mac किंवा Windows PC ला कनेक्ट करा. Mac वर Finder किंवा Windows वर iTunes डिव्हाइस ओळखतंय याची खात्री करा.
advertisement
DFU मोडमध्ये टाका – जर तुमच्या आयफोनमध्ये Face ID असेल तर:
आधी Volume Up प्रेस करा, नंतर Volume Down.
मग Side बटण स्क्रीन ब्लॅक होईपर्यंत प्रेस ठेवा.
त्यानंतर Side + Volume Down बटण एकत्र 5 सेकंद दाबून ठेवा.
Side बटण सोडा पण Volume Down दाबलेलं ठेवा, जोपर्यंत Finder किंवा iTunes डिव्हाइस ओळखत नाही.
advertisement
Restore प्रक्रिया सुरू करा
Mac वर: Finder उघडा, Option की प्रेस करा आणि "Restore iPhone" वर क्लिक करा.
Windows वर: iTunes मध्ये Shift की प्रेस करा आणि "Restore" क्लिक करा.
यावेळी तुम्ही आधी डाउनलोड केलेली iOS 18.6.2 IPSW फाइल निवडा.
इंस्टॉलेशन पूर्ण होईपर्यंत थांबा – iPhone इंस्टॉलेशनदरम्यान अनेकदा रीस्टार्ट होईल. तोपर्यंत फोन कॉम्प्युटरला जोडलेलाच ठेवा.
advertisement
Restore नंतर सेटअप : डाउनग्रेड पूर्ण झाल्यावर तुम्ही iPhone नव्याने सेट करू शकता किंवा आधीच्या बॅकअपमधून डेटा रिस्टोर करू शकता. लक्षात ठेवा, हे डाउनग्रेड नेहमी उपलब्ध नसेल. ॲपलने साइन-इन बंद केलं की तुम्ही iOS 18.6.2 इंस्टॉल करू शकणार नाही.
त्यामुळे जर iOS 26 तुमच्या पसंतीचं नसेल, तर आत्ताच डाउनग्रेड करणे सर्वोत्तम. त्यानंतर पुन्हा Find My iPhone ऑन करायला आणि तुमच्या Apple ID ने साइन-इन करायला विसरू नका.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 8:38 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Iphone स्लो झालाय आणि बॅटरी ड्रेन? मग iOS 26 वरून iOS 18.6.2 ला फोन करा डाउनग्रेड, ही पद्धत स्टेप बाय स्टेप करा फॉलो