सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे हसनने त्याच्या फिटनेस प्रवासात चॅटजीपीटी कडून फक्त सात प्रॉम्प्ट वापरले. याचा अर्थ ट्रेडमिल नाही, कोणतेही सप्लिमेंट्स नाहीत, तर एक स्पष्ट आणि सातत्यपूर्ण प्लॅन आहे.
हसन टेक इंडस्ट्रीमध्ये काम करतो, जिथे जास्त वेळ बसणे सामान्य आहे. त्याने स्पष्टपणे सांगितले की, त्याचे ट्रान्सफॉर्मेशन जादूचे नव्हती. तर त्यात डेली शिस्ट होती. त्याच्या मते, चॅटजीपीटीने केवळ मोटिव्हेशन दिले नाही. तर अशी गोष्ट दिली ज्याची लोकांना सर्वात जास्त कमतरता होती आणि ते एक स्ट्रक्चर दिले.
advertisement
झोपताना YouTube चालूच राहून जातं? या फीचरने फोन आपोआप होईल ऑफ
पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. काही लोकांनी त्याची खिल्लीही उडवली. पण अनेकांनी त्यात खरोखरच अनुकूल दृष्टिकोन पाहिला. जिम फी नाही, महागडे जेवण नाही, कठीण दिनचर्या नाहीत - फक्त असा प्लॅन जो तुमच्या लाइफस्टाइलच्या हिशोबाने चालतो.
हसन यांनी सांगितले की, त्यांनी सर्वात आधी ChatGPT च्या माध्यमातून त्याच्या शरीराचे अॅनालिसिस करुन घेतले. त्याने त्याचे वजन, वय, उंची आणि लक्ष्य टाकले आणि 12 आठवड्यांच्या फिटनेस आणि डायट प्लॅन मागितला.
एक डायट प्लॅन तयार केला
त्यानंतर, त्याने त्याच्या डायटवर फोकस केले. ChatGPTने त्याच्यासाठी हाय-प्रोटीन, निश्चित-कॅलरी वीकली मील प्लॅन तयार केला. ज्यामध्ये सामान्य आणि स्वस्त वस्तूंचा समावेश होता. यामुळे काय खावे हे शोधण्याचं टेन्शन कमी झालं.
वर्कआउटसाठी, त्याने चार दिवसांच्या घरगुती व्यायाम केला. प्रत्येक सेशनमध्ये 25-35 मिनिटे चालले, कोणत्याही इक्विपमेंट घेतले नाही. शरीरावर अचानक ताण येऊ नये म्हणून एक्सरसाइज लेव्हल हळूहळू वाढवली गेली.
घरबसल्या जिंकू शकाल 2 लाख! UIDAI देतेय संधी, लवकरच सुरु होणार रजिस्ट्रेशन
चॅटजीपीटीने त्याला क्रेव्हिंग्स कमी करण्यासाठी देखील मदत केली. हसनने लो-कॅलरी स्नॅक्सची लिस्ट तयार केली आणि जास्त खाणे टाळण्यासाठी लहान स्व-चर्चा मेसेज तयार केले.
अकाउंटेबिलिटीसाठी, ChatGPT ने दररोज त्याचे अन्न, झोप आणि व्यायाम यांचा आढावा घेतला. संपूर्ण योजनेचा आठवड्यातून एकदा आढावा घेण्यात आला आणि आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले.
डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, AI वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही आणि हसन सहमत आहे. तो फक्त म्हणाला की AI काम करत नाही, उलट त्याला त्याचे काम कसे मॅनेज करायचे हे शिकवले.
या स्टोरमधून सर्वात मोठा धडा असा आहे की लोक अनेकदा प्रेरणा नसल्यामुळे नव्हे तर योग्य आणि शाश्वत योजनेच्या अभावामुळे हार मानतात. हसनचा प्रवास दाखवतो की कधीकधी सर्वोत्तम प्रशिक्षक तो असतो जो शांतपणे चेकलिस्ट देतो आणि यावेळी ती चेकलिस्ट AI ने तयार केली आहे.
