OnePlus Nord Buds 3
वनप्लसच्या या इअरबड्सना बाजारात मोठी मागणी आहे. कंपनीने या डिव्हाइसमध्ये 12.4mm डायनॅमिक ड्रायव्हर्स दिले आहेत. याशिवाय डिव्हाइसमध्ये 4 मायक्रोफोन देण्यात आले आहेत. पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus Nord Buds 3 मध्ये 58mAh बॅटरी आहे. कंपनीच्या मते, हा डिव्हाइस ANC वर 8 तासांचा बॅकअप देतो. चार्जिंग केससह हे डिव्हाइस 28 तास टिकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, चार्जिंग केस आणि इअरबड्स एकत्र चार्ज केल्याने फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगसह 11 तासांचा बॅकअप मिळतो. ANC, IP55 रेटिंग, ब्लूटूथ 5.4 सारखे फीचर्सही यामध्ये देण्यात आले आहेत. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर या डिव्हाइसची किंमत 2099 रुपये ठेवण्यात आली आहे.
advertisement
WhatsApp च्या कोट्यवधी यूझर्ससाठी गुडन्यूज! आलंय नवं फीचर
Realme Buds T310
Realme चे हे इयरबड्स देखील बाजारात खूप पसंत केले जात आहेत. या डिव्हाइसमध्ये ANC, 12.4mm डायनॅमिक ड्रायव्हर्स सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. कंपनीच्या मते, हे इयरबड्स 40 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. याशिवाय यात फास्ट चार्जिंगसाठीही सपोर्ट आहे. हे डिव्हाइस IP55 रेटिंगसह येते. याचा अर्थ हे इयरबड्स पाणी आणि धूळमुळे खराब होत नाहीत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे इयरबड्स फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगसह 5 तासांचा बॅकअप देतात. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर या डिव्हाइसची किंमत 1998 रुपये ठेवण्यात आली आहे.
Airtel की Jio, पोस्टपेड प्लॅनमध्ये कोण बेस्ट? स्वस्त प्लॅन कुठे? घ्या जाणून
OnePlus Nord Buds 3 Pro
OnePlus चे हे इयरबड्स कंपनीच्या बेस्ट इयरबड्सपैकी एक मानले जातात. या डिव्हाइसमध्ये अॅक्टिव्ह नॉइस कँसलेशन 12.4 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स देखील आहेत. हे इयरबड 44 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. तसेच, हे डिव्हाइस केवळ 10 मिनिटांच्या चार्जवर 11 तासांचा बॅकअप देते. या इअरबड्समध्ये 3 बिल्ट-इन मायक्रोफोन आहेत. तसेच, यात ब्लूटूथ 5.4 आहे जे इतर डिव्हाइसशी सहज कनेक्ट होते. हे डिव्हाइस ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर 2799 रुपयांना लिस्ट करण्यात आले आहे.
Boat Nirvana
बोटचे हे इअरबड्स प्रिमियम इयरबड्स मानले जातात. जे बाजारातील अनेक डिव्हाइसशी स्पर्धा करतात. या डिव्हाइसमध्ये अॅक्टिव्ह नॉइस कॅन्शिलेशनसह 360 डिग्री स्पेशियल ऑडिओची सुविधा मिळते. कंपनीच्या मते, हा डिवाइस 50 तासांचा बॅटरी बॅकअप देतो. या डिव्हाइसचे वजन फक्त 45 ग्रॅम आहे. फ्लिपकार्टवर या इअरबड्सची किंमत 2999 रुपये आहे. याशिवाय, तुम्ही 145 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता.