Airtel की Jio, पोस्टपेड प्लॅनमध्ये कोण बेस्ट? स्वस्त प्लॅन कुठे? घ्या जाणून

Last Updated:

एअरटेल आणि रिलायन्स जिओकडे त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन आहेत. Jio आणि Airtel दोन्ही प्रीपेड तसेच पोस्टपेड ऑप्शन्स ऑफर करतात. रिलायन्स जिओ आणि एअरटेल मधील सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन कोणाकडे आहे चला पाहूया...

जिओ एअरटेल
जिओ एअरटेल
मुंबई : रिलायन्स जिओ आणि एअरटेल या देशातील दोन आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. जिओचा सध्या सुमारे 49 कोटी यूझर बेस आहे तर एअरटेलचा यूझर बेस सुमारे 40 कोटी आहे. दोन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना अनेक प्रकारचे प्लॅन्स ऑफर करतात. Jio आणि Airtel दोन्हीकडे प्रीपेड प्लॅन तसेच पोस्टपेड प्लॅन आहेत.
तुम्ही महागड्या प्रीपेड प्लॅनला कंटाळले असाल आणि पोस्टपेडवर जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जिओ की एअरटेलचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन कोणाकडे आहे. दोन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना पोस्टपेड प्लॅनमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा देतात.
advertisement

Jio-Airtel चा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन

Airtel चा स्वस्त प्लॅन
जर तुम्ही एअरटेल सिम वापरत असाल आणि तुमचे प्रीपेड कनेक्शन पोस्टपेडवर शिफ्ट करू इच्छित असाल तर तुम्हाला आधी प्लॅनची ​​माहिती घ्यावी लागेल. एअरटेलचा पोस्टपेड सेगमेंटमधील सर्वात स्वस्त प्लॅन 449 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना एका महिन्यासाठी 50GB डेटा देते. याचा अर्थ, डेटाच्या बाबतीत, हे एका महिन्याच्या प्रीपेड प्लॅनपेक्षा बरेच चांगले आहे.
advertisement
या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचीही ऑफर देण्यात आली आहे. यासोबतच तुम्हाला 100 एसएमएस देखील दिले जातात. याशिवाय, जर तुम्ही OTT स्ट्रीमिंग करत असाल, तर या पोस्टपेड प्लॅनसह तुम्हाला Airtel Extreme Play Premium चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
जिओचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन
आपण Jio च्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनबद्दल बोललो तर यामध्ये तुम्हाला 349 रुपयांचा ऑप्शन मिळेल. या पोस्टपेड प्लॅनमध्ये Jio आपल्या ग्राहकांना एका महिन्यासाठी 30GB डेटा ऑफर करते. या प्लॅनमध्ये तुम्हाला सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग दिली जाते. प्रीपेड प्रमाणे या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला दररोज 100 SMS मिळतात.
advertisement
या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमटेड 5G डेटा देखील मिळतो. यासोबतच प्रीपेड प्रमाणे तुम्हाला Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळते.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Airtel की Jio, पोस्टपेड प्लॅनमध्ये कोण बेस्ट? स्वस्त प्लॅन कुठे? घ्या जाणून
Next Article
advertisement
Solapur Crime News: अनैतिक संबंधांना विरोध केला अन् पतीनेच पत्नीला संपवलं! सोलापूरात हादरवणारी घटना
अनैतिक संबंधांना विरोध केला अन् पतीनेच पत्नीला संपवलं! सोलापूरात हादरवणारी घटना
  • अनैतिक संबंधांना विरोध केला अन् पतीनेच पत्नीला संपवलं! सोलापूरात हादरवणारी घटना

  • अनैतिक संबंधांना विरोध केला अन् पतीनेच पत्नीला संपवलं! सोलापूरात हादरवणारी घटना

  • अनैतिक संबंधांना विरोध केला अन् पतीनेच पत्नीला संपवलं! सोलापूरात हादरवणारी घटना

View All
advertisement