Airtel चा 99 रुपयांचा प्लान, मिळेल अनलिमिटेड डेटा

Last Updated:

एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 99 रुपये आहे. त्यात अनलिमिटेड डेटाची मजा घेता येते.

एअरटेल प्लॅन्स
एअरटेल प्लॅन्स
मुंबई : मोबाईल ही आता आपली जीवनावश्यक गरज झाली आहे. सगळी महत्त्वाची कामं मोबाईलवरच होतात. मोबाइल सुरू ठेवणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. म्हणूनच दर महिन्याला रिचार्जही करावं लागतं. कारण पूर्वीप्रमाणे आता प्लॅन संपल्यानंतर जास्त दिवस इन्कमिंग कॉल्सची सुविधा सुरू राहत नाही. प्लॅन संपल्यावर एसएमएसदेखील पाठवता येत नाहीत आणि डेटा वापरण्याचा तर प्रश्नच नाही. म्हणूनच प्रत्येक जण जास्तीत जास्त किफायतशीर प्लॅनच्या शोधात असतो. एअरटेलच्या अशाच एका किफायतशीर प्लॅनबद्दल आपण माहिती घेऊ या.
जुलै महिन्यात सगळ्या प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत मोठी वाढ केली होती. त्यानंतर सगळ्यांच्या बजेटवर परिणाम झाला. त्यामुळे प्रत्येक जण आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळेल, अशा प्लॅनच्या शोधात असतो, जेणेकरून कमीत कमी पैसे मोजून अधिकाधिक सुविधांचा लाभ घेता यावा. असा एअरटेलचा एक प्लॅन असून, त्याची किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी आहे. त्या प्लॅनबद्दल जाणून घेऊ या.
advertisement
एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 99 रुपये आहे. त्यात अनलिमिटेड डेटाची मजा घेता येते. या प्लॅनची व्हॅलिडिटी फक्त दोन दिवस आहे. याचाच अर्थ असा, की ज्यांना थोड्या कालावधीसाठी खूप जास्त प्रमाणात इंटरनेट वापरायचं असेल, त्यांच्यासाठी हा प्लॅन अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांच्याकडे आधीच एखादा प्लॅन अॅक्टिव्ह असेल, त्यांनाच हा 99 रुपयांचा प्लॅन अॅक्टिव्ह करता येईल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दर दिवशी वीस जीबी डेटा देण्यात येतो.
advertisement

100 रुपयांपेक्षा कमी किमतीचा प्लॅन

हा प्लॅन जिओच्या प्लॅनसारखा वाटू शकतो; मात्र त्यात फरक आहे. जिओ कंपनीदेखील अशा प्रकारे 100 रुपयांपेक्षा कमी किमतीचा प्लॅन देते. जिओचा प्लॅन 86 रुपयांचा आहे. तो प्लॅन 28 दिवसांचा आहे. यात 28 दिवसांसाठी 14 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएससारखे बेनिफिट्स मिळत नाहीत.
advertisement

प्लॅनच्या किमती वाढल्याने ग्राहकांना भुर्दंड

ग्राहकांनी आपापल्या गरजेनुसार रिसर्च करून कोणताही रिचार्ज प्लॅन घेतल्यास फायदेशीर ठरतं. कारण आता प्लॅनच्या किमती वाढल्याने ग्राहकांना भुर्दंड पडतो. काही प्लॅन्समध्ये सुविधा भरपूर असतात; मात्र त्या सगळ्या सुविधा प्रत्येक ग्राहकाच्या उपयोगाच्याच असतात असं नाही. त्यामुळे आपण नेमकं काय वापरतो, काय पाहतो, कशासाठी फोनचा जास्त वापर करतो, याचा अभ्यास करून रिचार्ज करावं.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Airtel चा 99 रुपयांचा प्लान, मिळेल अनलिमिटेड डेटा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement