एखाद्या नंबरवरुन वारंवार कॉल येताय? ब्लॉक न करता असा करा पत्ता कट
BSNL चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
BSNL च्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत 1,198 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवस किंवा 12 महिने आहे. या प्लॅनच्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, यूझर्सना देशभरातील कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी दर महिन्याला 300 फ्री मिनिटे दिली जातात. याशिवाय या प्लॅनमध्ये लोकांना दर महिन्याला 3GB हाय स्पीड 3G/4G डेटा मिळतो. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये यूजर्सना दर महिन्याला 30 फ्री एसएमएसची सुविधाही मिळते.
advertisement
स्मार्टफोनचं जबरदस्त फीचर! चोरी करुनही तुमचा फोन राहील सुरक्षित
स्वस्त झाला प्लॅन
नवीन प्लॅन लॉन्च केल्यावर, BSNL ने आपल्या 365 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत देखील कमी केली आहे. कंपनीने या प्लॅनची किंमत 100 रुपयांनी कमी केली आहे. याच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या या प्लॅनमध्ये लोकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये यूजर्सला कोणत्याही डेली लिमिटशिवाय एकूण 600GB डेटा मिळतो. याशिवाय प्लॅनमध्ये यूझर्सना दररोज 100 फ्री एसएमएस देखील दिले जातात. या प्लॅनची किंमत आधी 1999 रुपये होती. जी आता 1899 रुपये झाली आहे. ज्या लोकांना त्यांचे बीएसएनएल सिम अॅक्टिव्ह ठेवायचे आहे आणि ते सेकेंडरी सिम म्हणून वापरायचे आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन अधिक चांगला मानला जातो.
