स्मार्टफोनचं जबरदस्त फीचर! चोरी करुनही तुमचा फोन राहील सुरक्षित

Last Updated:

थोडं स्क्रोल केल्यावर तिथे तुम्हाला गुगल नावाचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला दोन सेक्शन दिसतील.

टेक्नॉलॉजी न्यूज
टेक्नॉलॉजी न्यूज
मुंबई : फोन आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. बँकेचे व्यवहार, ऑनलाइन शॉपिंग आणि काही लोकांची ऑफिसची कामंही फोनमधून होतात. आपलं काम सोपं करणाऱ्या या फोनच्या चोरीच्या घटना खूप घडतात. रस्त्यावर चालताना, प्रवासात फोन चोरी होण्याचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे फोन सुरक्षित ठेवणं हे एक आव्हानात्मक काम आहे. फोन चोरी झाल्यावर तो परत कसा मिळवायचा, यासाठी काही ऑप्शन्स आहेत. या ऑप्शन्सच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन लॉक करू शकता, ते लॉक चोराला उघडता येणार नाही. यासाठी तुम्हाला फोनमध्ये सेटिंग्ज बदलावी लागतील.
फोनमध्ये सेटिंग बदला
तुमचा फोन चोरी जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला तसं सेटिंग करावं लागेल. सर्वांत आधी तुमचा स्मार्टफोन चालू करा आणि त्यातील सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जा.
थोडं स्क्रोल केल्यावर तिथे तुम्हाला गुगल नावाचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला दोन सेक्शन दिसतील. त्यापैकी ऑल सर्व्हिसेस नावाच्या सेक्शनवर क्लिक करा.
advertisement
त्यानंतर तुम्ही आणखी थोडं खाली स्क्रोल केलं की तिथे तुम्हाला ‘थेफ्ट प्रोटेक्शन’ नावाचा एक पर्याय दिसेल. यात तुम्हाला सर्वात वर दोन ऑप्शन दिसतील. पहिल्या ऑप्शनमध्ये ‘थेफ्ट डिटेक्शन लॉक’ असेल. हे ऑप्शन एनेबल करा.
हे सेटिंग बदलल्यानंतर कोणीही तुमचा फोन डिटेक्ट केला की तो लॉक होईल. यातील दुसऱ्या ऑप्शनमध्ये डिव्हाईस लॉक आहे. हा ऑप्शन एनेबल केल्यावर जर तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणी तुमचा फोन वापरण्याचा प्रयत्न केला तर तो आपोआप लॉक होईल.
advertisement
फोनमधील रिमोट लॉक ऑप्शन
रिमोट लॉक फीचर खूप फायद्याचे आहे. तुमचा फोन चोरीला गेल्यावर ते फीचर त्याला android.com/lock लिंकवर नेते. तुम्ही जेव्हा त्याचा सेटअप करता तेव्हा तो मोबाईल नंबर मागेल. मोबाईल नंबर आणि सिक्युरिटी चॅलेंजबरोबर हे फीचर वापरता येते. समजा जर तुमचा फोन चोरी झाला आहे, तर तुम्ही दुसऱ्या फोनवरून तुमचा चोरीला गेलेला फोन लॉक करू शकता. असे केल्याने चोर तुमचा फोन अनलॉक करू शकणार नाही.
advertisement
ऑफलाईन डिव्हाईस लॉक फीचर
ऑफलाईन डिव्हाईस लॉक फीचर फोन सुरक्षित ठेवते. हे फीचर तुमच्या फोनचे इंटरनेट बंद असताना काम करते. समजा तुमचा फोन चोरीला गेला तेव्हा त्याचा डेटा बंद असेल, त्यावेळी तुम्ही या फंक्शनच्या मदतीने फोनचा गैरवापर होणे रोखू शकता.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
स्मार्टफोनचं जबरदस्त फीचर! चोरी करुनही तुमचा फोन राहील सुरक्षित
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement