एखाद्या नंबरवरुन वारंवार कॉल येताय? ब्लॉक न करता असा करा पत्ता कट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्हाला लोक वारंवार कॉल करत असतील आणि त्यांच्यापासून सुटका हवी असेल तर आज आम्ही तुम्हाला काही सोप्या सेटिंग्जबद्दल सांगणार आहोत.
Tech Knowledge: अनेक वेळा अशी परिस्थिती असते जेव्हा तुम्ही काही महत्त्वाच्या कामात व्यस्त असता किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा कॉल अटेंड करू इच्छित नसता. परंतु कॉल ब्लॉक न करता तुमचा फोन बंद असल्याचे दाखवायचे असते. यासाठी एक ट्रिक आहे, ज्याद्वारे तुमचा फोन चालू असतानाही तो बंद झालेला दिसेल. चला जाणून घेऊया ही ट्रिक
फोन ऑन राहील पण तरीही तो ऑफ दाखवेल
फोन बंद आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुमच्या फोनच्या कॉल्स सेक्शनमध्ये जा आणि तेथे "सप्लिमेंटरी सर्व्हिस" चा ऑप्शन पहा. हे नाव वेगवेगळ्या फोनमध्ये थोडे वेगळे असण्याची शक्यता आहे, परंतु ते सहज सापडू शकते.
advertisement
कॉल वेटिंग ऑप्शन डिसेबल करा: सप्लीमेंटरी सर्व्हिसवर गेल्यानंतर, "कॉल वेटिंग"चा ऑप्शन दिसेल. अनेक स्मार्टफोन्समध्ये हा ऑप्शन आधीच सुरू केलेला आहे. तुम्हाला त्याला डिसेबल करावं लागेल.
कॉल फॉरवर्डिंग सेट करा: यानंतर "कॉल फॉरवर्डिंग" ऑप्शनवर जा. येथे तुम्हाला व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉलचा ऑप्शन मिळेल. व्हॉईस कॉल वर क्लिक करा.
Forward when Busy ऑप्शन वापरा: यानंतर “Forward when Busy” या ऑप्शनवर क्लिक करा. आता ज्या नंबरवर तुम्हाला स्विच ऑफ दाखवायचा आहे तो नंबर टाका. लक्षात ठेवा, येथे नेहमी बंद असलेला नंबर वापरा. इनेबल ऑप्शनवर क्लिक करा आणि सेटिंग्ज सेव्ह करा. आता जेव्हा कोणी कॉल करेल तेव्हा तुमचा फोन चालू असला तरीही बंद झालेला दिसेल.
advertisement
हे ॲप कॉल करणाऱ्याच्या नावाची घोषणा करेल
तुम्हाला कॉल आल्यावर कॉलरचे नाव बोलायचे असेल तर त्यासाठी “ट्रू कॉलर” ॲप वापरा. ते तुमच्या फोनवर इन्स्टॉल केलेले नसल्यास, ते ॲप स्टोअरवरून डाउनलोड करा.
ट्रू कॉलर ॲप उघडा, थ्री डॉट्सवर क्लिक करा आणि "सेटिंग्ज" वर जा. यानंतर “Calls” या ऑप्शनवर क्लिक करा.
येथे तुम्हाला “Anounce Calls” चा ऑप्शन मिळेल, तो इनेबल करा. आता जेव्हा कोणी कॉल करेल तेव्हा ट्रू कॉलर ॲप कॉल करणाऱ्याच्या नावाची घोषणा करेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 03, 2024 12:11 PM IST









