खरं तर, इंजिन ही एक मॅकेनिकल सिस्टम आहे ज्यामध्ये अनेक भाग एकत्र काम करतात. कोणत्याही एका भागातील कमकुवतपणा कारच्या पिकअप, मायलेज, इंजिनच्या आयुष्यावर आणि कामगिरीवर थेट परिणाम करेल.
Engine Oil Level तपासणे महत्त्वाचे आहे
इंजिन ऑइल लेव्हल कमी झाले तर इंजिनचे ल्युब्रिकेशन कमी होईल. ज्यामुळे घर्षण वाढेल आणि इंजिन लवकर गरम होईल. सर्व्हिसिंग दरम्यान ऑइल लेव्हल योग्यरित्या तपासणे अत्यंत महत्वाचे आहे.
advertisement
Amazonने कोट्यवधी यूझर्सना दिली वॉर्निंग! ब्लॅक फ्रायडे सेलदरम्यान संकट
Engine Oil Quality
केवळ इंजिन ऑइल लेव्हलच नाही तर ऑइलची क्वालिटी देखील तपासणे अत्यंत महत्वाचे आहे. जुन्या इंजिन ऑइलमध्ये वाढलेले कार्बनचे डिपॉजिट वाढल्याने स्मूदनेस कमी करू शकतात आणि कारच्या परफॉर्मेंसवर लक्षणीय परिणाम करू शकतात.
Oil Filter
हे फिल्टर इंजिनमध्ये अशुद्धता जाण्यापासून रोखण्यास मदत करते, म्हणून इंजिन चालू ठेवण्यासाठी प्रत्येक सर्व्हिसिंग दरम्यान ऑइल फिल्टर बदलणे चांगले.
Chrome वापरणाऱ्यांसाठी मोठा धोका! सरकारने जारी केला अलर्ट, लगेच करा हे काम
Air Filter
एअर फिल्टर घाणेरडा असेल तर इंजिनला पुरेशी हवा मिळणार नाही, ज्याचा थेट परिणाम वाहनाच्या मायलेज आणि पिकअपवर होईल. म्हणून, प्रत्येक सर्व्हिसिंगमध्ये ते बदलणे चांगले.
थ्रॉटल क्लीनिंग महत्वाचे
थ्रॉटल क्लीनिंग थ्रॉटल बॉडीमधून कार्बन काढून टाकते. थ्रॉटल बॉडी साफ केल्याने इंजिनची कार्यक्षमता, फ्यूलची बचत आणि सुरळीत ड्रायव्हिंग सुधारते. म्हणून, सर्व्हिसिंग दरम्यान थ्रॉटल बॉडी नेहमीच स्वच्छ करणे महत्वाचे आहे.
