Chrome वापरणाऱ्यांसाठी मोठा धोका! सरकारने जारी केला अलर्ट, लगेच करा हे काम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Google Chromeच्या जुन्या व्हर्जनमध्ये गंभीर सुरक्षा धोके आढळून आल्या आहेत. CERT-In ने एक अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये यूझर्सना त्यांचे ब्राउझर त्वरित अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबई : भारत सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी, CERT-In ने गुगल क्रोम यूझर्ससाठी एक मोठा आणि गंभीर इशारा जारी केला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये जारी केलेला हा इशारा High Severity कॅटेगिरीमध्ये ठेवण्यात आलाय. म्हणजेच क्रोमच्या जुन्या व्हर्जन वापरणाऱ्या लाखो यूझर्ससाठी ही कमतरता अत्यंत धोकादायक असू शकते. CERT-In ने म्हटले आहे की, हॅकर्सनी या सुरक्षा कमतरतेचा गैरफायदा घेतला तर ते तुमच्या सिस्टमवर दूरबसून वाटेल तो कोड चालवू शकतात. यामुळे तुमच्या लॅपटॉप किंवा कंप्यूटरचा संपूर्ण डेटा, फाइल्स आणि अकाउंट हॅकिंगच्या जाळ्यात अडकू शकतात.
सरकारच्या मते, गुगल क्रोमच्या काही जुन्या व्हर्जनमध्ये V8 JavaScript इंजिनशी संबंधित अनेक गंभीर भेद्यता आढळून आल्या आहेत. या भेद्यता टाइप कन्फ्यूजन म्हणून ओळखल्या जातात. हॅकर्स या भेद्यतेचा फायदा फक्त तेव्हाच घेऊ शकतात जेव्हा ते यूझर्सला विशिष्ट वेबपेजवर क्लिक करण्यास भाग पाडतात. याचा अर्थ असा की फक्त चुकीची लिंक उघडल्याने तुमची सिस्टम हॅकरच्या नियंत्रणाखाली येऊ शकते. म्हणून, हा इशारा सामान्य यूझर्ससाठी महत्त्वाची आहे.
advertisement
CERT-In ने म्हटले आहे की, विंडोज, मॅकओएस आणि लिनक्स या तिन्ही प्लॅटफॉर्मवरील क्रोम यूझर्स जर जुन्या व्हर्जन वापरत असतील तर त्यांना धोका आहे. विशेषतः ज्या यूझरचे क्रोम व्हर्जन यापेक्षा जुनी आहे.
Windowsसाठी 142.0.7444.175/.176, macOS साठी 142.0.7444.176 आणि लिनक्ससाठी 142.0.7444.175. तुमचे Chrome या व्हर्जनपेक्षा जुने असेल, तर ते त्वरित अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
advertisement
सरकार आणि Google दोघांनीही यूझर्सना लेटेस्ट क्रोम अपडेट ताबडतोब इंस्टॉल करण्याचा सल्ला दिला आहे, कारण गुगलने सुरक्षा पॅच जारी केले आहेत. क्रोम अपडेट करणे खूप सोपे आहे.
- Chrome उघडा
- वरच्या उजवीकडे असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा
- Settingsवर जा
- About Chrome वर जा
- ब्राउझर आपोआप अपडेट डाउनलोड करेल.
- अपडेट इंस्टॉल झाल्यानंतर क्रोम रीस्टार्ट करा
- हे अपडेट हॅकर्सद्वारे शोषण होऊ शकणाऱ्या सर्व सुरक्षा त्रुटी दूर करते.
advertisement
हे अपडेट तुमच्या सिस्टमला गंभीर धोक्यांपासून वाचवते. हॅकर्स तुमच्या सिस्टममध्ये मालवेअर इंजेक्ट करण्यासाठी, तुमच्या पर्सनल फाइल्स आणि पासवर्ड चोरण्यासाठी, तुमच्या बँकिंग माहितीमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि तुमच्या कंप्यूटवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी या त्रुटींचा फायदा घेऊ शकतात. फक्त एक अपडेट तुम्हाला या सर्व धोक्यांपासून वाचवू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 4:57 PM IST


