Vegetable Price : बाबो! चिकनपेक्षाही महाग झाली ही भाजी, किंमत इतकी की आकडा वाचूनच चक्कर येईल

Last Updated:
Vegetable Price Increased : भाज्यांचे दर वाढले आहेच. पण एक अशी भाजी ज्याची किंमत इतकी वाढली आहे की त्यासमोर चिकनही स्वस्त वाटतं आहे.
1/7
भाजी आणि चिकनमध्ये काय स्वस्त काय महाग विचारलं तर साहजिकच भाजी स्वस्त आणि चिकन महाग असं तुम्ही सांगाल. पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल, एका भाजी जिची किंमत इतकी वाढली आहे, की भाजीपेक्षा चिकन स्वस्त झालं आहे. 

advertisement
2/7
पुणे मार्केट यार्डातील या भाजीची आवक तब्बल 90 टक्क्यांनी घटली आहे.  एरवी घाऊक बाजारात दररोज 4 ते 5 हजार किलो आवक होत असते. पण सोमवारी केवळ 400 ते 500 किलो आली. तीही फक्त आंध्र प्रदेशातून.

3/7
छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडीच्या मंडीमध्येही आवक घटली आहे. जाधववाडीत 9 नोव्हेंबर रोजी 14 क्विंटलआवक होऊन 3000 ते 6200 रुपये क्विंटलने विक्री झाली होती, तर गुरुवारी 9 क्विंटल आवक होऊन 7000 ते 11000 रुपये क्विंटलने विक्री झाली.

4/7
त्याचाच परिणाम ही भाजी 60 रुपये पाव या दराने किरकोळ विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या आठवड्यात जी भाजी 140 ते 150 रुपये किलो दराने मिळत होती, त्याची किंमत आता थेट 500 रुपयांवर पोहोचली आहे. घाऊक बाजारात 10 किलोला 3000 चा भाव मिळत असल्याची माहिती आहे.

5/7
मागणीच्या तुलनेत आवक अतिशय कमी झाल्यामुळे ही दरवाढ झाली. सोलापूर जिल्ह्यात या भाजीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण अतिवृष्टीमुळे सोलापूरसह अनेक भागांतील पीक उद्ध्वस्त झालं आहे. यामुळे यंदाचा हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे.

6/7
आता ही भाजी कोणती तर शेवग्याच्या शेंगा. शेवगा उष्ण असल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत गृहिणींकडून शेवग्याला मोठी मागणी असते.  मुंबईसह राज्यभरातील साऊथ इंडियन हॉटेल चालकांकडून सांबार, रसमसाठी शेवग्याला वर्षभर मोठी मागणी असते. दररोज मोठी खरेदी करणारे हे व्यावसायिक आता वाढलेल्या दरामुळे चिंतेत सापडले आहेत.

7/7
मधुमेह आणि इतर आजारांसाठीही शेवगा गुणकारी असल्याने त्याचा वापर वाढला आहे. त्यातच आता शेवग्याला सोन्याचा भाव आल्यामुळे ही आरोग्यदायी भाजी आता सर्वसामान्यांच्या ताटातून गायब होतेय की काय अशी चिंता व्यक्त केली जाते आहे.

ZP Election : महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं...
महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं
  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

View All
advertisement