Dharmendra: धरमजींची इच्छा अखेर अपूर्णच, महाराष्ट्राच्या 'त्या' जिल्ह्याला राजधानी करण्याचं होतं स्वप्न! भरभरून केलेलं कौतुक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dharmendra Passes Away: धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गोष्टी केल्या. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती, जी दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नाही.
advertisement
advertisement
धर्मेंद्र हे निसर्गाचे आणि विशेषतः वाघांचे मोठे चाहते होते. २०१०-११ दरम्यान एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विदर्भातील जंगलांबद्दल आपले प्रेम व्यक्त केले होते. धर्मेंद्र म्हणाले होते, "निसर्गाची विशालता, त्याचे अदम्य सौंदर्य आणि त्याच्या असंख्य रंगछटांनी नेहमीच माझ्या मनावर अमिट छाप सोडली आहे."
advertisement
नागपूर आणि विदर्भात मोठ्या संख्येने वाघांचे वास्तव्य आहे. हे जाणून त्यांना खूप आनंद झाला होता. "माझ्या मते, वाघ हे जंगलातील सर्वात सुंदर प्राणी आहेत आणि त्यांचे जतन केले पाहिजे," असे मत त्यांनी व्यक्त केले होते. याचवेळी त्यांनी नागपूरला 'जागतिक व्याघ्र राजधानी' बनवले पाहिजे, अशी इच्छाही वर्तवली होती.
advertisement
धर्मेंद्र यांनी तेव्हाच विदर्भातील जंगलांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण एका गोष्टीमुळे त्यांना ही भेट पुढे ढकलावी लागली होती. याबाबत ते म्हणाले होते, "मी लवकरच या भागात सहलीला जाण्याचा विचार करत आहे. अमिताभ अलीकडेच पेंचमध्ये होते आणि मी तेव्हा त्यांच्याशी बोललो होतो. त्यांनीही मला येथील जंगलाच्या सौंदर्याबद्दल सांगितले."
advertisement
त्यावेळी त्यांनी जिम कॉर्बेट आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात भेट दिली होती आणि त्यानंतर नागपूरला भेट देण्याची योजना आखली होती. मात्र, काही कारणास्तव त्यांची ही योजना पूर्ण होऊ शकली नाही, अशी खंत वन्यप्रेमींनी व्यक्त केली आहे. नागपूर केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण बनू शकते, असे त्यांचे ठाम मत होते.


