नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांसमोरच व्यक्त केली 'ती' इच्छा; देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द, म्हणाले...
- Published by:Prachi Amale
- Reported by:SANJAY SHENDE
Last Updated:
नवनीत राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिलाय. यामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अमरावती : अमरावतीच्या धारणी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील चोथमल आणि धारणीमधील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी मी पुन्हा येईन, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली. नवनीत राणा यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यावर सूचक वक्तव्य केले आहे. आमची माजी खासदार आता तुमच्या आशीर्वादाने माजी खासदार राहणार नाही, असे म्हणत नवनीत राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिलाय. यामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
धारणी येथील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणांच्या खासदार पदाविषयी सूचक वक्तव्य केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवणार किंवा मोठी कुठलीतरी जबाबदारी मिळेल अशा चर्चांना उधाण आले आहे. यावर नवनीत राणा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नवनीत राणा काय म्हणाल्या? (Navneet Rana Reaction on Devendra Fadnavis)
advertisement
नवनीत राणा म्हणाले, देवा भाऊ राज्यातील सगळ्या महिलांच्या डोक्यावर हात ठेवून महिलांना विश्वास दिला आहे. सर्व महिलांच्या पाठीशी ते उभे आहेत.भावासमोर बहिणींनी बोलणं काही नवल नाही. यापूर्वी देवा भाऊंनी शायरी केली होती. "मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बांध लेना,मै समंदर हू मै फिर लोट के आऊंगा..."मी त्याच पद्धतीने देवा भाऊ समोर माझ मत व्यक्त केलं आहे. मै फिर के आऊंगी.. मी पुन्हा येईल असं म्हटलं यात काही चुकीचं नाही...आणि माझ्या भावाने सांगितलं की माजी खासदार नवनीत राणा या माजी राहणार नाही, असा माझ्या माहेरी येऊन शब्द दिलेला आहे आणि देवा भाऊ हे शब्द पाळणारे आहेत.
advertisement
लाडकी बहीण योजनेवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांच्या या सूचक वक्तव्यामुळे नवनीत राणा यांना मोठे पद मिळेल असं मानलं जात आहे. देवेंद्र फडणवीस भाषणात पुढे म्हणाले की, विरोधक आरोप करत होते की, लाडकी बहीण योजना बंद होणार. पण आम्ही बंद केली नाही. जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे येत राहणार आहे. आम्ही एकदा येऊन पळून जाणारे लोक नाही.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
November 25, 2025 3:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांसमोरच व्यक्त केली 'ती' इच्छा; देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द, म्हणाले...


