हनीकॉम्ब हे आधुनिक डिझाइनचे असतात. ते मधमाशीच्या जाळ्याप्रमाणे तयार केलेले असते ज्यामुळे गार हवा देण्यासाठी ते ओळखले जातात. कप गवताचे पॅड् हे जुन्या काळापासून वापरले जाताय. त्याची किंमत कमी आहे आणि कूलिंगही चांगली देते. या दोन्ही ऑप्शनचे काही फायदे आणि नुकसान आहेत. यामुळेच पाहूया तुमच्यासाठी काय बेस्ट ठरतं.
गवताच्या कूलिंग पॅडचे फायदे
advertisement
- गवतच्या कूलिंग पॅडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते स्वस्तात मिळतात. किंमत कमी असल्याने गरज असल्यास तुम्ही ते लवकर बदलू शकता.
- तुमच्या परिसरातील पाण्यात जास्त मीठ असेल किंवा तुम्ही बोअरचं पाणी वापरत असाल तर हे उपयोगी ठरतात. कारण ते बदलणं सोपं आणि स्वस्त आहे.
- गवताचे कूलिंग पॅड हे लवकर ओले होतात. तसंच पाणी लवकर शोषूण घेतात. ज्यामुळे कूलर लगेच गार हवा देण्यास सुरुवात करतं.
- हे कुलिंग पॅड नैसर्गिक साहित्यापासून तायर केले, ज्यामुळे पर्यावरणासाठीही बेस्ट ठरतात.
advertisement
उन्हाळ्यात खुपच जास्त वीज बिल येतं ना? टेन्शन कसलं घेताय? या ट्रिक ट्राय करा, होतो फायदा
हनीकॉम्ब कूलिंग पॅडचे फायदे
- हनीकॉम्ब कूलिंग पॅड आधुनिक टेक्नॉलॉजीने तयार केलेले असतात. हे सामान्यतः सेल्युलोज पेपरने तयार केले जातात आणि ते मधमाशीच्या जाळ्याप्रमाणे असतात.
- हे मजबूत असतात, त्यामुळे जास्त टिकाऊ असतात. पाण्यात मीठाचे प्रमाण कमी असल्यास, ते ती ते पाच वर्षेही वापरले जाऊ शकतात.
- या पॅटच्या डिझाइनमुळे पाणी पूर्ण पॅडमध्ये समान पसरतं, ज्यामुळे चांगली कूलिंग मिळते. यासोबतच ते दीर्घकाळ ओले राहतात. ज्यामुळे कूलरची हवा जास्त गार वाटते.
advertisement
गवताच्या कूलिंग पॅडचे दुष्परिणाम
- गवताचे कूलिंग पॅड जास्त टिकाऊ नाही. ते अनेकदा बदलावे लागतात.
- या कूलिंग पॅडमध्ये धूळ आणि घाण लवकर जमा होते. एकदा घाण गेल्यावर ते स्वच्छ करणं कठीण होतं आणि योग्यप्रकारे काम करत नाही.
- या पॅडमध्ये घाण अडकली तर ते पूर्णपणे ओले होत नाही आणि गारवाही कमी येतो.
advertisement
ऑनलाइन AC खरेदी करताय? आधी जाणून घ्या या गोष्टी, अन्यथा होईल पाश्चाताप
हनीकॉम्ब पॅडचे दुष्परिणाम
- हनीकॉम्ब पॅडची सर्वात मोठी कमतरता त्याची किंमत आहे. हे गवताच्या पॅडच्या तुलनेत खुप महाग असतात.
- पाण्यात मीठ जास्त असेल तर ते आत जमा होऊन त्याचे मार्ग बंद करू शकते, ज्यामुळे ते ओले होत नाहीत.
- दीर्घकाळ वापरल्यावर दुर्गंधी येण्याची समस्याही येऊ शकते.
कोणता ऑप्शन ठरतो बेस्ट
- तुम्हाला वारंवार कूलिंग पॅड बदलण्याचा त्रास नको असेल आणि जास्त पैसे देण्यास अडचण नसेल तर हनीकॉम्ब पॅड खरेदी करू शकता.
- तुमचं बजेट मर्यादित असेल आणि कमी खर्चा गारेगार हवा हवी असेल तर पारंपारीक गवताचा पॅड बेस्ट ठरतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 2:54 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Honeycomb Vs Grass: कूलरसाठी कोणता कूलिंग पॅड बेस्ट? घरात जास्त गार हवा कोण देतं? पाहाच
