उन्हाळ्यात खुपच जास्त वीज बिल येतं ना? टेन्शन कसलं घेताय? या ट्रिक ट्राय करा, होतो फायदा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Reduce Electricity Bill In Summer: उन्हाळा सुरू झाला की, उष्णता वाढते. तसं वीज बिल वाढण्यासही सुरुवात होते. पण छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचं वीज बिल 25 ते 30 टक्क्यांनी कमी होऊ शकतं.
मुंबई : भारतातील अनेक भागांमध्ये तीव्र उन्हाळा सुरू झालाय. लोक उष्णतेमुळे हैराण झालेय. हे असताना जास्त येणाऱ्या वीज बिलामुळेही लोकं टेन्शनमध्ये येतात. कारण या काळात एसी कूलर हे सतत चालत असतात. ज्यामुळे वीज बिल हे डबल स्पीडने पळू लागतं. पण तुम्ही काही सोप्या सवयी फॉलो केल्या तर तुमचं वीज बिल हे 25-30% नी कमी होऊ शकतं. चला जाणून घेऊया अशाच काही टिप्सविषयी ज्यामुळे तुमच्या खिशावरील भार हा कमी होईल.
advertisement
advertisement
advertisement
दरवाजे-खिडक्या पॅक ठेवा : एसी चालवताना दरवाजे खिडक्या पॅक करा, जेणेकरुन बाहेरील हवा आत येणार नाही. खिडकी किंवा दरवाज्याच्या खाली गॅप असेल तर तो सील करा. गार हवा आत राहिली तर एसी कमी चालेल. या सोबतच एसीच्या फिल्टरमध्ये जमा झालेली धूल हवेचे मार्ग अडवते. यामुळे कूलिंग कमी होते आणि मशीनला जास्त वीज खर्च करावी लागते. प्रत्येक 15 दिवसात फिल्टर स्वच्छ करा. यामुळे एसीची लाइफही वाढेल आणि बिलही कमी होईल.
advertisement
advertisement
advertisement









