MHADA Lottery : मार्केटपेक्षा कमी रेट, तुमच्या स्वप्नातलं घर आता मुंबई, म्हाडाकडून 2500 घरांचा मुहूर्त ठरला, कधी निघणार लॉटरी?
Last Updated:
MHADA Draw Date : तयार राहा लवकरच म्हाडा अनेक घरांसाठी सोडत जाहीर करणार आहे. नक्की ही सोडतीची तारीख कधी जाहीर होईल आणि म्हाडाची घरं कोणत्या प्राईम लोकेशनवर आहेत, त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.
मुंबई : मुंबई या मोठ्या शहरातील प्राईम लोकेशनवर आपलं हक्काच घर असाव असं प्रत्येकाला वाटतं. हेच स्वप्न उराशी बाळगून अनेकजण सिटीमध्ये येतात. तसेच पैसे कमवून घर घेण्याचा विचार करतात. पण गगनाला भिडणाऱ्या किंमती आणि आर्थिक गोष्टींमुळे घण घेणं टाळतो. मात्र आता सर्वसामान्यांना म्हाडाकडून दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे.
कधी निघणार सोडत?
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अंदाजे 2500 घरांसाठी आता सोडत ही मंगळवारी अर्थात 31 मार्च रोजी प्रसिद्द होण्याचे नियोजन आहे. मात्र यामध्ये नक्की कोणत्या प्राईम लोकेशनवर म्हाडाची घर उपलब्ध आहेत आणि किती लाखांपर्यंत मिळतील याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
लोकेशन काय?
मुंबई म्हाडाची सोडतीतील घरं पहाडी गोरेवामध्ये असून या मधील घरांच्या किंमती 32 लाख रुपये असण्याची शक्यता आहे तर विक्रोळी कन्नमवार नगरमधील 1221 घरे सोडतीत असून ती अंदाजे 80 लाख रुपये तर वांद्र्यातील ही घरे बऱ्याच वर्षांनंतर सोडतीत समाविष्ट असणार आहे.
advertisement
बोरिवलीतील चार घरांच्या किंमती 1 कोटी 7 लाख ते 1 कोटी 92 लाख दरम्यान असणार असून तुंगा,पवईतील घरे 1 कोटी 35 ते 1 कोटी 98 लाख रुपयांच्या दरम्यान असणार आहेत.खरं पाहिलं तर या किंमती सर्वसामान्यांना जास्त वाटतं असल्या तरी मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये नक्कीच असणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 12:29 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery : मार्केटपेक्षा कमी रेट, तुमच्या स्वप्नातलं घर आता मुंबई, म्हाडाकडून 2500 घरांचा मुहूर्त ठरला, कधी निघणार लॉटरी?







