रेखाचा 'जिगरी दोस्त', ज्याने अमिताभ बच्चन यांचीही उडवलेली झोप; बॉक्स ऑफिस हादरवून सोडलं होतं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Actor : रेखाचं नाव नेहमी अमिताभ बच्चन यांच्याशी जोडलं जातं. पण अमिताभ यांच्याशिवाय आणखी एक सुपरस्टार ज्याच्याशी रेखाची खूप घट्ट मैत्री राहिली आहे. रेखाने या मित्रासोबत तब्बल 40 वर्षे बॉलिवूडमध्ये कामही केलं आहे. या हिरोने हिट फिल्मे देऊन बिग बींची झोप उडवली होती.
advertisement
या अभिनेत्याचा जन्म 1942 मध्ये पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला. त्याच्या वडिलांचा आर्टिफिशियल ज्वेलरीचा बिझनेस होता. कित्येक फिल्म स्टुडिओ आणि प्रोड्युसरकडे ते आर्टिफिशिअल ज्वेलरीसाठी जायचे. हा अभिनेता आपल्या वडिलांच्या बिझनेसमध्ये त्यांची मदत करायचा. याचवेळी अभिनेत्याची भेट व्ही. शांताराम यांच्याशी झाली.
advertisement
चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांनीच या अभिनेत्याला चित्रपटांमध्ये आणलं. त्याने हिरोईनच्या बॉडी डबल आणि ज्युनिअर आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. 1964 साली रिलीज झालेल्या 'गीत गया पत्थारों ने' या फिल्ममधून व्ही. शांताराम यांनी आपली मुलगी राजश्रीसोबत या अभिनेत्याला यांना लाँच केलं आणि इथून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
advertisement
या अभिनेत्याने त्याच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत 200 हून अधिक फिल्ममध्ये काम केलं. त्यातील बहुतेक फिल्म्स हिट झाल्या. कित्येकदा त्याने अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा अशा त्या काळातील सुपरस्टार्सनाही मागे टाकलं. 1967 साली प्रदर्शित झालेली फिल्म या अभिनेत्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. या चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे ते एक मोठे स्टार बनले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
advertisement
advertisement
हा अभिनेता आहे जितेंद्र. 1976 मध्ये प्रदर्शित झालेली त्याची फिल्म त्यांचा 'नागिन' हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 1977 मध्ये जितेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांनाही कडवी टक्कर दिली. 'धर्म-वीर' या चित्रपटाने खळबळ उडवून दिली. 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जानी दुश्मन' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं.
advertisement
advertisement
advertisement







