advertisement

Solapur: उजव्या हाताच्या बोटाऐवजी डॉक्टरांनी कापलं डाव्या हाताचं बोट, पंढरपुरातील धक्कादायक प्रकार

Last Updated:

पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एका सहा वर्षांच्या चिमुरड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा कळस पाहायला मिळाला.

pandharpur news
pandharpur news
वीरेंद्रसिंह उत्पाट, प्रतिनिधी पंढरपूर: विठ्ठलाच्या नगरीतून वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एका सहा वर्षांच्या चिमुरड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा कळस पाहायला मिळाला. उजव्या हाताच्या बोटावर शस्त्रक्रिया करायची असताना, डॉक्टरांनी चक्क डाव्या हाताचं बोट कापून काढल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला असून पंढरपुरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शाहू सुनील दंदाडे (वय ६ वर्ष) या बालकाला जन्मतःच दोन्ही हातांना सहा-सहा बोटे होती. गेल्या काही दिवसांपासून शाहूच्या उजव्या हाताच्या सहाव्या बोटामध्ये वेदना होत होत्या. त्यामुळे पालकांनी त्याला उपचारासाठी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून उजव्या हाताचे ते वाढीव बोट शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याचा सल्ला दिला.
advertisement

शस्त्रक्रियेत डॉक्टरांची मोठी चूक

शुक्रवारी या चिमुरड्यावर शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं. पालकांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रिया गृहात नेण्यापूर्वी उजव्या हाताच्या बोटावर उपचार होणार असल्याचे निश्चित होतं. मात्र, शस्त्रक्रिया संपल्यानंतर जेव्हा मुलाला बाहेर आणण्यात आलं, तेव्हा पालकांना धक्काच बसला. डॉक्टरांनी ज्या उजव्या हाताच्या बोटाचा त्रास होत होता ते सोडून, सुस्थितीत असलेल्या डाव्या हाताचं बोट कापून काढलं.
advertisement
"माझ्या मुलाच्या उजव्या हाताच्या बोटाला त्रास होता, पण डॉक्टरांनी विचार न करता डाव्या हाताचे बोट कापले. हा आमच्या मुलाच्या भविष्याशी खेळ आहे," असा संतप्त आरोप दंदाडे कुटुंबीयांनी केला आहे. डॉक्टरांच्या या बेजबाबदारपणामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांशी संपर्क साधला असता, त्यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतल्याचं सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि जो कोणी दोषी आढळेल त्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: उजव्या हाताच्या बोटाऐवजी डॉक्टरांनी कापलं डाव्या हाताचं बोट, पंढरपुरातील धक्कादायक प्रकार
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement