Gold Loan बेस्ट की Personal Loan? पैशांची गरज असल्यासं तुमच्यासाठी योग्य कोणतं? पाहा डिटेल्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
अनेकदा अचानक पैशांची गरज पडते. आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात. अशावेली लोन घ्यावं लागतं. मग गोल्ड लोन घ्यावं की पर्सनल लोन? चला पाहूया...
मुंबई : काही वेळा आपल्याला अचानक पैशांची गरज पडते. यावेळी लोन घ्यावं हा विचार डोक्यात येतो. पण गोल्ड लोन घ्यावं की पर्सनल लोन? हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊया. या दोन्ही लोनचे फायदे वेगवेगळे आहेत. पण तुमच्यासाठी कोणतं बेस्ट आहे याविषयी आपण जाणून घेऊया.
गोल्ड लोनमध्ये कमी व्याज आणि लवकर पैसा मिळण्याचा फायदा असतो. तर पर्सनल लोनमध्ये तुम्हाला काहीच तारण ठेवावं लागत नाही. अशावेळी तुमच्या स्थितीसाठी कोणतं लोन योग्य ठरतं हे तुम्हाला निवडावं लागेल. हे तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असतं. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
गोल्ड लोन म्हणजे काय?
गोल्ड लोन हे सिक्योर्ड लोन असतं. ज्यात तुम्ही सोनं, नाणी किंवा दागिने तारण ठेवून लोन घेता. लेंडर तुमच्या सोन्याची किंमत आकलन करते आणि त्या आधारावर तुम्हाला रक्कम देते. ठरलेल्या वेळेच्या आत तुम्हाला व्याजासह रक्कम निवडावी लागते. पूर्ण रक्कम फेडल्यानंतर तुमचं सोनं हे परत मिळतं.
advertisement
पर्सनल लोन म्हणजे काय?
पर्सनल लोन एक असा आर्थिक ऑप्शन आहे. ज्यामध्ये तुम्हाला एकरकमी रक्कम मिळते. जी तुम्ही लग्न, मेडिकल एमर्जेंसी, घराची दुरुस्ती किंवा इतर गरजांसाठी वापरू शकता. हे लोन सिक्योर्ड आणि अनसिक्योर्ड दोन्ही प्रकारचं असू शकतं. सिक्योर्ड लोनमध्ये तुम्हाला कोणतीही संपत्ती तारण ठेवावी लागत नाही. तर अनसिक्योर्ड लोनमध्ये लोनच्या गॅरंटीची गरज नसते. खरंतर गॅरंटीशिवाय असणाऱ्या पर्सनल लोनवर व्याजदर जास्त असते. यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे गरजेचे आहे.
advertisement
गोल्ड आणि पर्सनल लोनमध्ये फरक काय?
- गोल्ड लोन हे सिक्योर्ड असतं. कारण त्यात सोनं तारण ठेवलं जातं. या लोनचं व्याजदर 8.5% – 15% p.a. किंवा यापेक्षा कमी असू शकतं.
- पर्सनल लोन हे अनसिक्योर्ड लोन असतं. यात काहीही तारण ठेवलेलं नसतं. ज्यामुळे व्याजदर 9.99% – 30% p.a. किंवा जास्त असतं.
- गोल्ड लोन घेतल्यावर तुम्हाला सोन्याच्या अमाउंटच्या 70 ते 75 टक्के लोन मिळतं. तर पर्सनल लोन हे तुमच्या इन्कमवर अवंलबून असते.
- गोल्ड लोन अप्लाय केल्यावर तुम्हाला काही तास किंवा 1 दिवसांत मिळतं. तर पर्सनल लोन अप्लाय केल्यावर तुम्हाला 1 ते 7 दिवसांत मिळतं.
- गोल्ड लोन घेताना तुम्हाला जास्त डॉक्यूमेंटची गरज नसते. तुम्हाला केवायसी आणि गोल्ड व्हॅल्यूएशन करावं लागतं. पण पर्सनल लोन घेताना इन्कम प्रूफ, केड्रिट स्कोअर हे लागतं.
- गोल्ड लोन हे तुम्हाला 3 वर्षे ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी मिळतं. तर पर्सनल लोन हे 1 ते 7 वर्षांच्या कालावधीसाठी मिळतं.
- गोल्ड लोन घेताना तुमचा क्रेडिट स्कोअर पाहिला जात नाही. पण पर्सनल लोन घेताना क्रेडिट स्कोअर खुप महत्त्वाचा ठरतो.
- गोल्ड लोनचे फायदे म्हणजे, तुम्हाला ते कमी व्याजात मिळतं, वेगाने अप्रूव्ह होतं आणि प्रोसेस सोपी आहे. पर्सनल लोनमध्ये एसेट रिस्क नाही, टेन्योर मोठा आहे. तसंच जास्त लोन मिळू शकतं.
- गोल्ड लोनचं नुकसान म्हणजे, तुम्हाला सोनं तारण ठेवावं लागतं. तर पर्सनल लोनचं नुकसान म्हणजे, तुम्हाला जास्त व्याज द्यावं लागतं, तसंच एलिजिबल होण्याचे नियम कठोर आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 11:58 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Loan बेस्ट की Personal Loan? पैशांची गरज असल्यासं तुमच्यासाठी योग्य कोणतं? पाहा डिटेल्स










