advertisement

बक्कळ पगार अन् मान-सन्मान; तरी त्या एका गोष्टीसाठी सगळं घालवलं, पुण्यातील प्रांताधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं

Last Updated:

आंबेगाव-जुन्नर विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद शिंदे यांना २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं.

२ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं (प्रतिकात्मक फोटोः)
२ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं (प्रतिकात्मक फोटोः)
पुणे : शासकीय सेवेतील वरिष्ठ पद, समाजात मान-सन्मान आणि हातात बक्कळ पगार असतानाही केवळ काही पैशांच्या हव्यासापोटी एका मोठ्या अधिकाऱ्याने नको ते केलं. आंबेगाव-जुन्नर विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद शिंदे यांना २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. शुक्रवारी दुपारी मंचर येथील कार्यालयात त्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं. या धक्कादायक कारवाईमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
कशासाठी घेतली लाच?
एका बांधकाम व्यावसायिकाने नारायणगाव परिसरात (पुणे-नाशिक महामार्ग) भागीदारीत एक गृहप्रकल्प सुरू केला आहे. या इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, 'अंशतः पूर्णत्व प्रमाणपत्र' मिळवण्यासाठी त्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. हे प्रमाणपत्र मंजूर करण्यासाठी गोविंद शिंदे यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.
advertisement
तक्रारदाराने या लाचेच्या मागणीबाबत २४ मार्च रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, शिंदे यांनी तडजोडीनंतर २ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचं समोर आलं. अखेर शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास मंचर येथील उपविभागीय कार्यालयातच तक्रारदाराकडून २ लाख रुपये घेताना एसीबीच्या पथकाने शिंदे यांना रंगेहाथ पकडले.
advertisement
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक आयुक्त दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि प्रवीण निंबाळकर यांनी ही कारवाई केली. एका जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे भ्रष्टाचाराचा मार्ग पत्करल्याने प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
बक्कळ पगार अन् मान-सन्मान; तरी त्या एका गोष्टीसाठी सगळं घालवलं, पुण्यातील प्रांताधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement