खोलीची नीट तपासणी करा
सर्व प्रथम खोलीची काळजीपूर्वक तपासणी करा. स्मोक डिटेक्टर, अलार्म क्लॉक, लँप, टीव्ही किंवा पॉवर आउटलेट यांसारख्या दुर्लक्षित ठिकाणी लपवलेले कॅमेरे सहसा स्थापित केले जातात. कॅमेरे अनेकदा लहान छिद्रांमागे किंवा उपकरणामध्ये लपलेले असतात. लाइट बंद करा आणि तुमच्या मोबाईलचा टॉर्च वापरा. कॅमेराची लेन्स चमकदार आहे, जी फ्लॅलाइटच्या प्रकाशात दिसू शकते. भिंती, छत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर लक्ष केंद्रित करा.
advertisement
हा आहे Jio चा पैसा वसुल प्लॅन! 3 महिने फ्री मिळेल Disney+ Hotstarचं सब्सक्रिप्शन
मोबाईल कॅमेराने स्कॅन करा
तुमच्या फोनचा कॅमेरा चालू करा आणि खोलीभोवती स्कॅन करा. काहीवेळा छुपे कॅमेरे इन्फ्रारेड लाइटचा वापर करतात. जो उघड्या डोळ्यांना दिसत नाही, परंतु मोबाईल कॅमेऱ्यात दिसू शकतो.
Wifi नेटवर्क चेक करा
लपलेले कॅमेरे अनेकदा वाय-फाय नेटवर्कद्वारे ऑपरेट करतात. खोलीचे वाय-फाय नेटवर्क तपासा आणि विचित्र डिव्हाइस नावांसाठी सतर्क रहा. यासाठी तुम्ही ‘फिंग’ सारखे ॲप वापरू शकता. छुपे कॅमेरे आणि मायक्रोफोन शोधण्यात मदत करणारी उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही ते खरेदी करू शकता आणि तुमच्या प्रवासात तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता.
Instagram ची चॅट लपवण्याचा जुगाड! तुम्हाला माहिती नसेल हे जबरदस्त सीक्रेट
हॉटेल व्यवस्थापनाला सूचित करा
तुम्हाला कोणतेही संशयास्पद उपकरण आढळल्यास, हॉटेल व्यवस्थापनाला ताबडतोब सूचित करा. त्यांच्या मदतीने तुम्ही ते काढून टाकू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या हॉटेलच्या खोलीत कॅमेरा लपलेला असू शकतो, तर या पद्धतींचा अवलंब करा आणि सतर्क राहा.