हा आहे Jio चा पैसा वसुल प्लॅन! 3 महिने फ्री मिळेल Disney+ Hotstarचं सब्सक्रिप्शन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Reliance Jio Free Disney+ Hotstar Plan: जिओचे काही प्लॅन्स यूझर्सला डेटा, कॉलिंग आणि एसएमएससह OTT ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देतात. आज आम्ही तुम्हाला Jio च्या अशाच एका प्लॅनविषयी सांगणार आहोत, ज्यामध्ये यूजर्सला Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
Reliance Jio Entertainment Plan: दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओचे देशभरात कोट्यवधी यूझर्स आहेत. यूझर्सच्या गरजा लक्षात घेऊन, कंपनी विविध किंमती श्रेणींमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या रिचार्ज प्लॅन्समध्ये, काही प्लॅन्स आहेत जे यूझर्सचा डेटा, कॉलिंग आणि एसएमएससह OTT ॲप्सचे फ्री सबस्क्रिप्शन देतात. आज आम्ही तुम्हाला Jio च्या अशाच एका प्लॅनविषयी सांगणार आहोत, ज्यामध्ये यूजर्सला Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. चला तुम्हाला या योजनेचे फायदे सांगतो.
जिओचा पैसा वसुल प्लॅन
Jio च्या पोर्टफोलिओमध्ये विविध प्राइज रेंजमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्स आहेत. पण, जर तुम्ही जिओचा पोर्टफोलिओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला एक प्लॅन दिसेल ज्याची किंमत 949 रुपये आहे. हा प्लॅन तुम्हाला जिओच्या वेबसाइटवरील एंटरटेनमेंट प्लॅन्स विभागात मिळेल. हा प्लॅन 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो आणि संपूर्ण व्हॅलिडिटी दरम्यान, यूझर्सना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळते.
advertisement
प्लॅनचे फायदे
या प्लॅनमध्ये जिओ यूजर्सना दररोज 100 टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सुविधा देखील मिळते. या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 168 GB डेटा मिळतो. अशा प्रकारे वापरकर्त्यांना दररोज 2 जीबी मिळते. तसेच, जर तुम्ही 5G फोन वापरत असाल आणि तुमच्या भागात 5G नेटवर्क उपलब्ध असेल, तर तुम्ही 5G इंटरनेट देखील वापरू शकता.
advertisement
प्लॅनचे फीचर्स
या प्लॅनची सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे यामध्ये यूजर्सना डिस्ने + हॉटस्टार मोबाईलचे 3 महिने म्हणजेच 90 दिवस फ्री सबस्क्रिप्शन मिळते. ज्याचा वापर तुम्ही ऑनलाइन कंटेंट पाहण्यासाठी करू शकता. याशिवाय, या प्लॅनमध्ये यूझर्सला Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळते.
advertisement
ज्या यूझर्सना चित्रपट, वेब सिरीज इत्यादी पाहणे आवडते त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला ठरु शकतो. तुम्हाला हा प्लॅन रिचार्ज करायचा असेल तर तुम्ही Jio च्या अधिकृत वेबसाइट, My Jio ॲप आणि Google Pay, Phone Pay इत्यादी ऑनलाइन पेमेंट ॲप्सद्वारे करू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 07, 2025 5:14 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
हा आहे Jio चा पैसा वसुल प्लॅन! 3 महिने फ्री मिळेल Disney+ Hotstarचं सब्सक्रिप्शन