Alcohol : रिकाम्या पोटी की जेवल्यानंतर, दारू नेमकी कधी प्यावी? डॉक्टरांनी थेट सांगितलं उत्तर
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अनेकदा मित्र-मंडळींसोबत मद्यपान करताना रिकाम्या पोटी दारू पिणे हे सामान्य मानले जाते. यामुळे लवकर नशा येते असे म्हटले जाते. पण, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आणि आरोग्य तज्ञांच्या मते, ही सवय तुमच्या शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे.
Drinking Alcohol With Empty Stomach Side Effects : अनेकदा मित्र-मंडळींसोबत मद्यपान करताना रिकाम्या पोटी दारू पिणे हे सामान्य मानले जाते. यामुळे लवकर नशा येते असे म्हटले जाते. पण, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आणि आरोग्य तज्ञांच्या मते, ही सवय तुमच्या शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. डॉक्टर भूषण भोले, यांनी रिकाम्या पोटी दारूचे सेवन केल्याने आरोग्यवर काय परिणाम होतात हे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते दारू पिणे ही सवयच वाईट आहे परंतु रिकाम्या पोटी तुम्ही दारू पीत असाल तर ते अधिक धोकादायक आहे.
डॉ. भोले इशारा देतात की जरी काही मिनिटांतच परिणाम होतात, तरी ब्लॅकआउट, मळमळ, उलट्या आणि धोकादायक नशेचा धोका जास्त असतो. अन्नाशिवाय मद्यपान करणे शरीरासाठी सुरक्षित नाही आणि अपघात आणि दीर्घकालीन हानीची शक्यता वाढवते. लोक त्या वेळी खूप मद्यधुंद दिसत नसले तरीही ब्लॅकआउट होऊ शकतात. डॉ. भोले मद्यपान करण्यापूर्वी आणि दरम्यान हायड्रेटेड राहण्याची शिफारस करतात. त्याच वेळी त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हेही त्यांनी सांगितले आहे.
advertisement
रिकाम्या पोटी दारू पिण्याचे काय आहेत दुष्परिणाम
थेट रक्तप्रवाहात शोषण
जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी दारू पिता, तेव्हा ती थेट पोटातील भिंतीमधून रक्तप्रवाहात शोषली जाते. यामुळे नशा लवकर येते, पण त्याचबरोबर शरीरावर त्याचे गंभीर परिणामही लवकर होतात.
यकृतवर अतिरिक्त ताण
लिव्हरचे मुख्य काम अल्कोहोलची चयापचय करणे आहे. रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात अल्कोहोल लगेच लिव्हरमध्ये पोहोचल्याने त्यावर मोठा ताण येतो, ज्यामुळे लिव्हरला गंभीर नुकसान होऊ शकते.
advertisement
लिव्हरचे आजार
या सवयीमुळे फॅटी लिव्हर, अल्कोहोलिक हेपेटायटिस आणि लिव्हर सिरोसिस सारखे गंभीर आजार होऊ शकतात.
पोटातील अल्सर आणि दाह
अल्कोहोल पोटातील आतील थराला थेट नुकसान पोहोचवते. यामुळे पोटातील अल्सर आणि आतड्यांमध्ये सूज येऊ शकते.
रक्तातील साखरेची पातळी घटते
रिकाम्या पोटी मद्यपान केल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक घटू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप धोकादायक ठरू शकते.
advertisement
मेंदू आणि पचनक्रियेवर परिणाम
अल्कोहोल थेट मेंदूपर्यंत पोहोचल्याने संतुलन बिघडते. तसेच, हे पचनक्रियेला ही नुकसान पोहोचवते. डॉक्टरांच्या मते, दारू पिण्यापूर्वी भरपेट जेवण करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे दारूचे शोषण हळू होते आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी होतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 2:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Alcohol : रिकाम्या पोटी की जेवल्यानंतर, दारू नेमकी कधी प्यावी? डॉक्टरांनी थेट सांगितलं उत्तर