Kantara Chapter 1 Trailer : 'कांतारा'च्या जगातील रहस्य उलगडणार! जबरदस्त ट्रेलर, तिच्या एन्ट्रीने लक्ष वेधलं, VIDEO

Last Updated:

Kantara Chapter 1 Trailer : 'कांतारा चॅप्टर 1' मध्ये कांताराचं सगळं रहस्य समोर येणार आहे. ऋषभ शेट्टीचा पुन्हा एकदा वेगळा आणि जबरदस्त अंदाज पाहायला मिळतोय. ऋषभ शेट्टीबरोबर असलेल्या त्या अभिनेत्रीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

News18
News18
मुंबई : 2022मध्ये आलेल्या 'कांतारा'च्या अपार यशानंतर 'कांतारा: चैप्टर 1'कडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. अखेर प्रेक्षकांची उत्सुकता जास्त न ताणता निर्मात्यांनी सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. 2025मधील ही सर्वात मोठी घोषणा असल्याचं मानलं जात आहे. सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आता निर्मात्यांनी या सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित केला आहे.  2025 मधील सर्वात मोठ्या सिनेमॅटिक सिनेमांपैकी हा एक सिनेमा मानला जात आहे.
'कांतारा चॅप्टर 1' मध्ये कांताराचं सगळं रहस्य समोर येणार आहे. ऋषभ शेट्टीचा पुन्हा एकदा वेगळा आणि जबरदस्त अंदाज पाहायला मिळतोय. ऋषभ शेट्टीबरोबर असलेल्या त्या अभिनेत्रीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा सिनेमा एक भव्य पॅन-इंडिया फिल्म म्हणून ओळखला जात आहे.  आणि तिच्या घोषणेनंतरपासूनच ती प्रेक्षकांच्या आणि माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
ट्रेलरमध्ये निर्मात्यांनी फारसे तपशील उघड न करता, एक गूढतेचा माहोल तयार केला आहे. या प्रीक्वलमधील रहस्यच चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहे. नेमकं काय घडणार आहे आणि या वर्षीच्या सर्वात मोठ्या चित्रपटात काय नवीन पाहायला मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
advertisement

कोण आहे ऋषभ शेट्टीसोबतची सुंदरी?

अभिनेता ऋषभ शेट्टीसोबत रुक्मिणी वसंत आणि गुलश दवैया हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. रुक्मिणी वसंत आणि ऋषभ शेट्टीचे रोमँटिक सीन्सही पाहायला मिळत आहेत. रुक्मिणी वसंत हा एक नवा चेहरा यानिमित्तानं प्रेक्षकांसमोर येणार आहे.
advertisement

भव्य वॉर सीक्वेन्स 

निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ शेअर करत ट्रेलरची अधिकृत घोषणा केली. 'कांतारा: चैप्टर 1'ची एक खास पोस्ट म्हणजे या सिनेमात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मदतीने एक भव्य वॉर सीक्वेन्स तयार केला आहे. या सीक्वेन्समध्ये 500 हुन अधिक कुशल फाइटर्स आणि 3000 लोक सहभागी आहेत. हा सीन 25 एकरच्या खडतर भूप्रदेशात, तब्बल 45- 50 दिवसांच्या शूटिंगनंतर चित्रित करण्यात आला आहे.  ज्यामुळे तो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य सीक्वेन्सपैकी एक ठरतो.
advertisement

'कांतारा: चैप्टर 1' रिलीज डेट 

'कांतारा: चैप्टर 1' येत्या 2 ऑक्टोबरला जगभरात रिलीज होणार आहे. कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी भाषांमध्ये हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Kantara Chapter 1 Trailer : 'कांतारा'च्या जगातील रहस्य उलगडणार! जबरदस्त ट्रेलर, तिच्या एन्ट्रीने लक्ष वेधलं, VIDEO
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement