दिल्लीपासून चेन्नई किंवा मुंबईत फक्त 15 ते 30 मिनिटांत पोहचू शकू. हे स्वप्नरंजन नसून 'हायपरसॉनिक जेट' विमानामुळे या सर्व गोष्टी शक्य होतील. हे जेट जगात एक नवीन वाहतूक क्रांती घडवून आणत आहे. त्याचा वेग ताशी 5700 किलोमीटर आहे. म्हणजेच या हायपरसॉनिक जेटने तुम्ही दिल्लीहून फक्त एका तासात लंडनला पोहोचाल. दिल्ली ते न्यूयॉर्क असा प्रवास फक्त दोन तासांत पूर्ण होईल.
advertisement
याचा शोध पूर्वीच लागलेला आहे. मात्र, आता त्याची चाचणी सुरू आहे. हायपरसॉनिक जेट लंडन ते न्यूयॉर्कदरम्यान पहिलं उड्डाण करेल. 'व्हीनस एरोस्पेस' नावाच्या कंपनीने त्याची निर्मिती केली आहे. हे जेट मॅक सहाच्या वेगापर्यंत पोहोचू शकते. या जेटचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट जास्त आहे. या आधी कॉनकॉर्ड हे जगातलं सर्वांत वेगवान विमान होतं. त्याने लंडन ते न्यूयॉर्क अंतर अवघ्या तीन तासांत पार केलं होतं. कॉनकॉर्ड हे जगातील सर्वात वेगवान प्रवासी विमान होते. त्याचा वेग ताशी 2500 किलोमीटर होता.
व्हीनस एरोस्पेसने गेल्या वर्षी व्हीनस डिटोनेशन रॅमजेट इंजिनची चाचणी केली होती. व्यावसायिक आणि संरक्षण अशा दोन्ही क्षेत्रात हायपरसॉनिक प्रवासाची सुविधा देणे, हा या इंजिनच्या निर्मितीमागील उद्देश आहे. या जेटच्या आगमनाने हवाई प्रवासाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदलून होईल. या हायपरसॉनिक जेटची किंमत 300 दशलक्ष डॉलर्स (2500 कोटी) आहे.
व्हीनस एरोस्पेस ही अमेरिकेतील टेक्सासस्थित कंपनी आहे. एका सामान्य विमानाला लंडन ते न्यूयॉर्क हे अंतर पार करण्यासाठी सात तास लागतात. पण, हे हायपरसॉनिक विमान लंडन ते न्यूयॉर्कमधील अंतर तासाभरात पार करेल.
