Infinix Smart 9HD Specifications
Infinix Smart 9 HD ही अनेक सुधारणांसह Smart 8 HD चं अपग्रेड व्हर्जन आहे. कंपनीचा दावा आहे की, त्यांच्या सेगमेंटमधील हा सर्वात मजबूत स्मार्टफोन आहे. त्याची 2,50,000 वेळा टेस्ट घेण्यात आली आहे, ज्यावरून त्याच्या मजबूत बिल्ड गुणवत्तेचा अंदाज लावला जाऊ शकतो. यासोबतच याला IP54 रेटिंग देण्यात आली आहे, ज्यामुळे ते धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करेल.
advertisement
Vi च्या या 6 महिन्याच्या स्वस्त प्लॅनने केली हवा! स्वस्तात मिळेल बरंच काही
यात 6.7 इंचाचा HD+ पंच-होल डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेट आणि 500 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा फोन MediaTek Helio G50 चिपसेट प्रोसेसरने सुसज्ज आहे. एवढेच नाही तर या स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम (3 व्हर्च्युअल रॅम) आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे.
पॉवरसाठी, यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 14.5 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक आणि 8.6 तास गेमिंगचा बॅकअप देण्यास सक्षम आहे. यासोबतच हा डिवाइस Android 14 Go Edition ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात 13MP रियर कॅमेरा (ड्युअल फ्लॅशसह) आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी डिव्हाइसमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे.
Window की स्प्लिट AC, कोणती आहे बेस्ट? खरेदीपूर्वी अवश्य घ्या जाणून
किंमत किती आहे
आता या फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Infinix ने Smart 9 HD ची किंमत 6199 रुपये ठेवली आहे. कंपनीने ते मिंट ग्रीन, कोरल गोल्ड आणि मेटॅलिक ब्लॅक अशा तीन कलरमध्ये बाजारात आणले आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ते खरेदी करू शकता. त्याचा सेल 4 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल.
Redmi 14C ला देईल टक्कर
Redmi 14C हा कंपनीचा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे. Infinix चा नवीन फोन Redmi 14C ला टक्कर देऊ शकतो. यात 6.8 इंचाचा डिस्प्ले आहे. याशिवाय या फोनमध्ये 4GB रॅम देण्यात आली आहे. हा फोन Mediatek Helio G81 अल्ट्रा चिपसेट प्रोसेसरने सुसज्ज आहे. तसेच, हे Android 14 हायपर ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. डिव्हाइसमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, स्मार्टफोनमध्ये 5160mAh बॅटरी आहे जी 18W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत 10,999 रुपये आहे.
