YouTuber Sam Kohl आणि JerryRigEverything चा ड्रॉप टेस्ट व्हिडीओ आजकाल इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
वास्तविक, Apple च्या iPhone 15 सीरीजची जगभरात विक्री सुरू झाली आहे, त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे, पण अलीकडेच त्याच्या टेस्टिंगचा व्हायरल झालेला व्हिडीओ लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहे.
advertisement
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube वर व्हायरल झालेल्या या व्हिडीओंनुसार, iPhone 15 Pro Max चे बॅक ग्लास पॅनल काही विशिष्ट परिस्थितींमध्ये सहजपणे तुटू शकते. पण त्याच्या आधीचे मॉडेल मात्र फारच चांगलं काम करत असल्याचं दिसत आहे.
iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये Apple चे Ceramic Shield मटेरियल आहे. हँडसेट टिकाऊ आणि उत्तम बनवण्यासाठी ग्रेड 5 टायटॅनियम आणि अॅल्युमिनियम सब स्ट्रक्चर वापरण्यात आले आहे. तथापि, ऑनलाइन पोस्ट केलेले ड्रॉप-टेस्ट व्हिडीओमध्ये मात्री काहीतरी वेगळेच दिसत आहेत.
Apple Tracks चा YouTuber सॅम कोहल आयफोन 15 प्रो आणि आयफोन 14 प्रो ची चाचणी घेण्यासाठी व्हिडीओ केला, जिथे त्याने दोन्ही फोन वारंवार खाली पाडले. कधी स्क्रिनच्या बाजूने, तर कधी कॅमेराकडून, तर कधी बाजूने या फोनला त्याने वेगवेगळ्या उंचीवरुन पाडले. सुरुवातीला दोघांना काहीच झाले नाही, पण जसजशी टेस्ट पुढे जात गेली तसतशी iPhone 15 Pro ची स्थिती बिघडू लागली. तथापि, आयफोन 14 प्रो त्या तुलनेत चांगलं काम करत होता. या चाचणीत एक गोष्ट आश्चर्यकारक होती ती म्हणजे नवीन iPhone 15 Pro चे अधिक नुकसान झाले. एवढेच नाही तर त्याने काम करणंही ही बंद केलं आणि ही काळाजी करण्यासाठी गोष्ट आहे.
याशिवाय JerryRigEverything ने iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max वर स्क्रॅच टेस्टिंग, हीटिंग टेस्टिंग, सॅंडपेपर आणि बरेच काही वापरून पाहिले.
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओंवर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. लोकांनी ही टेस्ट पाहिल्यानंतर त्या फोनवर प्रश्न उपस्थीत केले आहे.