Infogear ने iPhone लॉन्च केला होता
आयफोन नावाचा जगातील पहिला फोन 1998 मध्ये InfoGear या कॅलिफोर्नियास्थित कंपनीने लॉन्च केला होता. त्याची ओळख ‘इंटरनेट टचस्क्रीन टेलिफोन’ म्हणून करण्यात आली. साहजिकच, हा स्मार्टफोन नव्हता. InfoGear iPhone हा एक डेस्कटॉप टेलिफोन होता. InfoGear iPhone तीन मुख्य गोष्टी (फोन कॉल, ईमेल आणि लाइट वेब ब्राउझिंग) करण्यासाठी डिझाइन केले होते. यात स्लाईड-आउट QWERTY कीबोर्ड, वेब आणि ईमेलचा वापर करण्याची सुविधा 2 MB RAM उपलब्ध होती. हे डिव्हाइस मार्केटमध्ये 500 डॉलर पेक्षा कमी किमतीत विकले गेले होते. परंतु यामध्ये इंटरनेट अॅक्सेस करण्यासाठी तुम्हाला वेगळे शुल्क भरावे लागत होते. ज्यामध्ये 9.95 डॉलर प्रति महिना होता. अनलिमिडेट ब्राउझिंगसाठी अनलिमिटेड प्लॅनही होते. जे 19.95 डॉलरपासून सुरु होत होते.
advertisement
स्वस्तात मिळतोय Moto चा 12GB रॅम आणि 256GB स्टोरजचा स्मार्टफोन! पाहा कधीपासून होणार सेल
सिस्कोने इन्फोगियर विकत घेतले
InfoGear iPhone हा त्या काळातील सर्वात आघाडीचा फोन होता. ज्याला तितकीशी लोकप्रियता मिळाली नाही. म्हणूनच 1999 मध्ये नवीन डिझाइन सादर केल्यानंतर InfoGear ने iPhones बनवणे बंद केले. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला ही कंपनी Cisco Systems (सध्या जगातील सर्वात मोठी नेटवर्किंग कंपनी) ने विकत घेतली. 2006 पासून, Cisco ने एक व्हीओआयपी टेलीफोनसाठी नावाचा वापर केला. ज्याला लिंक्स आयफोन म्हटलं जातं.
तुम्हीही PhonePe, Paytm ने पेमेंट करता? मग या 5 गोष्टी अवश्य घ्या जाणून, अन्यथा...
इथून सुरु होते इंट्रेस्टिंग स्टोरी
2007 च्या सुरुवातीस स्टीव्ह जॉब्सने त्या वर्षीच्या मॅकवर्ल्ड कॉन्फरन्समध्ये Apple च्या पहिल्या आयफोनची घोषणा केली आणि सिस्कोने त्वरीत क्यूपर्टिनो कंपनीवर ट्रेडमार्क उल्लंघनासाठी दावा दाखल केला. मात्र, अॅपल आयफोन बाजारात येण्यापूर्वी (जून 2007) हा वाद मिटला होता. मात्र, त्यांनी या कराराचे आर्थिक डिटेल्स शेअर केले नाहीत. विशेष म्हणजे Apple आणि सिस्कोने मान्य केले की त्यांना आयफोनचे नाव वापरण्याचे अधिकार असतील. मात्र, तेव्हापासून कोणतेही Cisco iPhones पाहिलेले नाहीत आणि कदाचित भविष्यातही दिसणार नाहीत.
