5G पेक्षा 5.5G किती वेगळे आहे?
5G च्या अडव्हान्सड व्हर्जनला 5.5G म्हणतात. जी 5G च्या तुलनेत उत्तम इंटरनेट स्पीड, कमी लेटेंसी आणि इंप्रूव्ड नेटवर्क रिलायबिलिटी ऑफर करते. ही टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड इंटेलिजन्स फीचरला सपोर्ट करते. सध्या, Jio ने 5.5G म्हणजेच 5G Advanced with Release 18 सुरू केले आहे, जो प्रारंभिक टप्पा आहे. पूर्वीच्या 15, 16 आणि 17 च्या रिलीझच्या तुलनेत ही सुधारणा आहे. त्याच वेळी, हे प्रगत 5G टेक्नॉलॉजी रिलीज 21 पर्यंत विकसित होईल, जे 2028 पर्यंत लॉन्च केले जाऊ शकते.
advertisement
Redmi चे 3 भारी फोन झाले स्वस्त! एकावर तर 11 हजारांचं डिस्काउंट
Jio ने 2022 मध्ये True 5G सेवा सुरू केली. ज्याला Stand Alone म्हणजेच SA 5G सेवा म्हणतात. त्याच वेळी, एअरटेलने NSA म्हणजेच नॉन-स्टँड अलोन 5G सेवा सुरू केली होती. तसंच, Airtel नंतर SA 5G आणि Advanced 5G सर्व्हिस सुरू करेल. NSA मध्ये, 5G सेवा फक्त विद्यमान 4G पायाभूत सुविधांवर प्रदान केली जाते. NSA ची रेंज अधिक आहे, परंतु वेगाच्या बाबतीत SA अधिक चांगले मानले जाते. 5.5G मध्ये मल्टी कॅरियर एग्रिगेशन इनेबल केले जाऊ शकते, जेणेकरून यूझर्सना अखंड कनेक्टिव्हिटी मिळू शकेल.
व्हिडिओ लवकर डाउनलोड होत नाहीये? Wi-Fi चा प्रॉब्लम या 5 ट्रिकने करा दूर
Jio 5.5G मध्ये 1Gbps स्पीड
OnePlus 13 लाँच करताना, 5.5G सेवेचा डेमो व्हिडिओ दाखवण्यात आला होता. ज्यामध्ये डाउनलिंग स्पीड 277.78 Mbps होता आणि नॉन-कम्पोनंट कॅरियर्स (नॉन-3CC) मध्ये, Jio च्या नेटवर्कवर 1014.96 Mbps चा डाउनलिंग स्पीड दिसला होता. Jio च्या वेबसाइटनुसार, भारतातील Jio True 5G यूझर्सना 1Gbps च्या स्पीडने इंटरनेट मिळेल.