TRENDING:

9th Anniversaryला Jio चं गिफ्ट! 3 दिवसांसाठी फ्री मिळेल अनलिमिटेड 5G डेटा

Last Updated:

जिओने आपल्या यूझर्सना 5 ते 7 सप्टेंबर पर्यंत फ्री अनलिमिटेड 5G डेटा देण्याची घोषणा केली आहे. या ऑफरचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता ते जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : रिलायन्स जिओने 2016 मध्ये भारतात सुरुवात केली आणि लवकरच ती देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली. आता जिओने 9 वर्षे पूर्ण केली आहेत आणि यासोबत कंपनीने 500 दशलक्ष म्हणजेच 50 कोटी यूझर्सचा आकडाही ओलांडला आहे. तिच्या वर्धापनदिनानिमित्त जिओने ग्राहकांना एक खास ऑफर जाहीर केली आहे. जिओची वर्धापन दिन वीकेंड ऑफर 5 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पर्यंत चालेल. या काळात 5G आणि 4G ग्राहकांना याचा फायदा मिळेल. खास गोष्ट म्हणजे या काळात 5G यूझर्सना कोणत्याही शुल्काशिवाय फ्री अनलिमिटेड डेटा मिळेल.
जिओ न्यूज
जिओ न्यूज
advertisement

5G यूझर्ससाठी उत्तम ऑफर

तुम्ही Jio True 5G नेटवर्क आणि 5G हँडसेट वापरत असाल तर तुम्हाला तीन दिवसांसाठी कोणत्याही डेटा मर्यादेशिवाय जलद इंटरनेट मिळेल. तुम्ही ओटीटी स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग आणि मोठ्या फाइल्स डाउनलोड करण्यात याचा फायदा घेऊ शकता. चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणताही रिचार्ज किंवा अ‍ॅड-ऑन पॅक घेण्याची आवश्यकता नाही.

advertisement

फक्त 2 रुपयांच्या वाढीने झाला 15 कोटींचा नफा! Zomatoचा गेम प्लॅन एकदा पाहाच

4G ग्राहकांनाही ही सुविधा मिळेल

जिओची ही ऑफर खास आहे

जिओची ही ऑफर फक्त फ्री डेटा देण्यापुरती मर्यादित नाही. कंपनीकडून ग्राहकांना धन्यवाद देण्याचा हा एक मार्ग आहे. भारतात पहिल्यांदाच एखाद्या टेलिकॉम कंपनीने संपूर्ण वीकेंडसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात मोफत डेटा ऑफर केला आहे. हे जिओचे वाढते 5G कव्हरेज आणि तंत्रज्ञानाची ताकद देखील दर्शवते.

advertisement

पावसाळ्यात ट्रॅफिक जाम टाळायचंय? Google Maps करेल मदत, वापरा या ट्रिक्स

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

ही ऑफर 5 ते 7 सप्टेंबर या कालावधीत फक्त 3 दिवसांसाठी उपलब्ध असेल.

ऑफरचा लाभ घेण्यासाठी, तुमच्याकडे 5G हँडसेट आणि Jio True 5G नेटवर्क कव्हरेज असणे आवश्यक आहे. 4G ऑफरसाठी, तुम्हाला 39 रुपयांचा अॅड-ऑन घ्यावा लागेल.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
9th Anniversaryला Jio चं गिफ्ट! 3 दिवसांसाठी फ्री मिळेल अनलिमिटेड 5G डेटा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल