TRENDING:

Mobile Tips: मोबाईल चार्जिंग करताना तुम्हीही तीच चूक करताय? मग पैसे घालवायची तयारी ठेवा!

Last Updated:

Mobile Tips: मोबाईल फोन चार्जिंग करताना अनेकदा आपल्याकडून चुका होतात. त्याचा परिणाम मोबाईल लवकर खराब होण्यात होतो. त्यामुळे मोबाईल कसा चार्ज करावा? याबाबत जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहिल्यानगर: मोबाईल आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. तरीही मोबाईल वापरताना काही चुका केल्यामुळे मोबाईल लवकर खराब होण्याची शक्यता असते. विशेषतः चार्जिंग करण्याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आणि अज्ञान असतं. त्यासाठी मोबाईल कसा वापरावा? त्याची कशी काळजी घ्यावी? याबद्दल अहिल्यानगर येथील अभिजीत खांद्रे यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement

मोबाईल चार्जिंग करताना शक्य असल्यास बॅटरी 20 टक्क्यांपेक्षा कमी होऊ देऊ नका आणि 80 टक्क्यांपेक्षा जास्तही चार्ज करू नका. मोबाईलचा वापर जास्त होत असेल आणि तेव्हा फोन गरम होत असेल तर त्याला थोडा वेळ विश्रांती द्या. थेट सूर्यप्रकाशात किंवा गरम ठिकाणी फोन ठेवू नका. फोनचा वापर 2 तासापर्यंत ठेवला पाहिजे. जर जास्त काही महत्त्वाचं काम असेल तर मोबाईलला थोडी विश्रांती देऊन वापर करावा. जर दोन तासापेक्षा जास्त मोबाईल वापरण्यात येत असेल तर UV रेज चष्म्याचा वापर केला पाहिजे.

advertisement

Blood Donar Day: 100 वेळा रक्तदान करणारा ‘ब्लडडोनेट मॅन’! शरिरात झाला चमत्कारिक बदल, SPECIAL STORY

चार्जर ओरिजनलच वापरा

मोबाईल चार्जिंगसाठी ओरिजनल चार्जर आणि केबलचाच वापर करा. शक्यतो फोनसोबत आलेला चार्जरच वापरा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चार्जिंग करताना फोनचा वापर टाळा. चार्जिंग चालू असताना गेम खेळणे व जास्त डेटा वापरणे टाळा. यामुळे फोन गरम होऊ शकतो आणि बॅटरीवर ताण येऊ शकतो. तसेच जे ॲप्स वापरत नाही आहात ते बॅकग्राऊंडमधून बंद करा. यामुळे बॅटरीची बचत होते. स्क्रीनचा ब्राइटनेस आवश्यकतेनुसार ठेवा. जास्त ब्राइटनेसमुळे बॅटरी लवकर संपते.

advertisement

बॅटरीमुळे मोबाईल स्फोट होतो?

काही वेळा मोबाईलचा स्फोट झाल्याच्या घटना आपण ऐकतो. परंतु, मोबाईलचा स्फोट मदरबोर्डला तांत्रिक अडचण आल्याने किंवा व्यवस्थित वापर न झाल्याने होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने करावा. तसेच हाताळतानाही व्यवस्थित हाताळावा. त्यामुळे तुमचा मोबाईल आणि त्याची बॅटरी यांचंही आयुष्य वाढू शकतं, असं अभिजीत सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Mobile Tips: मोबाईल चार्जिंग करताना तुम्हीही तीच चूक करताय? मग पैसे घालवायची तयारी ठेवा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल