क्रेडिट कार्डचा वापर
अनेक लोक ऑनलाइन शॉपिंग करता तेव्हा अनेकदा कॅश ऑन डिलिव्हरी किंवा डेबिट कार्डने पेमेंट करता. पण तुम्हाला खरेदी केलेल्या प्रोडक्टवर चांगलं डिस्काउंट हवं असेल तर क्रेडिट कार्डने पेमेंट करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट क्रेडिट कार्ड कंपन्यांसोबत हातमिळवणी करते. याच कारणामुळे प्रोडक्ट्सच्या खरेदीवर चांगलं डिस्काउंट मिळतं.
advertisement
Realmeच्या 2 फोनच्या किंमतीत मोठी कपात! ऑफर पाहून झटपट होताय ऑर्डर
विकेंडला कधीच करु नका शॉपिंग
अनेक लोकांना वाटतं की, वीकेंडला ऑनलाइन शॉपिंग केल्याने त्यांना चांगलं डिस्काउंट मिळतं. मात्र हे उलट आहे. खरंतर वीकेंडवर सर्वाधिक क्राउड वेबसाइटवर अॅक्टिव्ह असतो. अशा वेळी तुम्ही शॉपिंग केली तर हे डिस्काउंट मिळण्याची शक्यता खूप कमी असते आणि डिस्काउंटही खूप कमी राहतं. तुम्हाला प्रोडक्टची खरेदी सर्वात जास्त डिस्काउंटवर करायची असेल तर शॉपिंग ऐवजी वर्किंग डेजवर शॉपिंग करा. कारण या दिवशी कमी लोक ऑनलाइन शॉपिंग करतात.
फॅशन इन्फ्लुएंसर्सला सोशल मीडियावर फॉलो करा
फॅशन इन्फ्लुएंसर्स सामान्यतः ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्ससोबत भागीदारी करतात आणि त्यांच्या प्रोडक्ट्सला प्रमोट करतात. या बदल्यात कंपनीकडून त्यांना कूपन कोड्स दिले जातता. जे ते आपल्या सब्सक्रायबरसोबत शेअर करतात आणि तुम्ही या कूपन कोड्सच्या मदतीने प्रोडक्टच्या खरेदीवर चांगलं डिस्काउंट मिळवू शकतात. ज्यामध्ये जास्तीत जास्त कपडे असतात. अशा वेळी तुम्ही अशा फॅशन इन्फ्लुएंसर्सला सोशल मीडियावर नेहमीच फॉलो करायला हवं.
Budget Phones : 6,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन! चांगल्या फोन्सलाही देईल टक्कर
EMI ऑप्शनवर करा खरेदी
तुम्ही एखादं महागडं प्रोडक्ट खरेदी करत असाल तर प्रयत्न करा की, प्रोडक्ट्स ईएमआय ऑप्शनवर खरेदी करा. खरंतर यामुळे तुम्हाला त्या प्रोडक्टच्या खरेदीवर चांगलं डिस्काउंट मिळतं. तसंच कॅश पेमेंट केल्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळणार नाही.
