premium rate service scam काय आहे?
प्रीमियम रेट सर्व्हिस स्कॅममध्ये यूझर्सना अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून मिस्ड कॉल येतात. यूझर्सने या नंबरवर परत कॉल केल्यास, तो प्रीमियम रेट सर्व्हिसशी जोडला जातो. या सेवेवर कॉल करण्यासाठी प्रति मिनिट खूप जास्त शुल्क आकारले जाते.
तुमच्या हॉटेल रुममध्ये Hidden Camera आहे? या ट्रिकने लगेच कळेल
advertisement
हा घोटाळा कसा चालतो?
या फसवणुकीत तुम्हाला अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून मिस्ड कॉल्स येतात. जेव्हा तुम्ही या नंबरवर परत कॉल करता, तेव्हा तुम्ही अशा सर्व्हिसशी जोडलेले असता जी कॉलिंगसाठी खूप शुल्क आकारते.
हा घोटाळा कसा ओळखायचा?
या फसवणुकीत, ज्या नंबरवरुन मिस्ड कॉल येतात त्यांचे देश कोड तुम्हाला ओळखीचे नसतात. स्कॅमर अनेकदा तुम्ही ओळखू शकणार नाही असे देश कोड वापरतात, ज्यामुळे कॉल खरा वाटू शकतो आणि तुम्ही या नंबरवर कॉल बॅक करु शकता.
Amazon अर्ध्या किंमतीत देतेय 15 लीटर स्टोरेजचं वॉटर हीटर! चेक करा 3 बेस्ट डील्स
सुरक्षित कसे राहायचे?
जोपर्यंत तुम्ही कॉलरला ओळखत नाही तोपर्यंत '+91' व्यतिरिक्त देश कोड असलेल्या नंबरवर कॉल बॅक करणे टाळा. संशयास्पद आंतरराष्ट्रीय नंबरवरून वारंवार येणारे कॉल थांबवण्यासाठी तुमच्या फोनवरील ब्लॉकिंग ऑप्शन वापरा. स्थानिक असो किंवा आंतरराष्ट्रीय असो, अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या कॉलला उत्तर देऊ नका किंवा परत कॉल करू नका. तुमच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि सहकाऱ्यांना या फसवणुकीबद्दल सांगा जेणेकरून ते पसरण्यापासून रोखता येईल.