TRENDING:

Jio, Airtel चे हे जबरदस्त प्लॅन ; Amazon Prime फ्री, डेटाही भरपूर

Last Updated:

Reliance Jio Vs Airtel Rs 1199 Recharge Plan: तुम्ही देखील Jio किंवा Airtel यूझर असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि OTT चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Reliance Jio Vs Airtel Rs 1199 Recharge Plan: एक काळ असा होता जेव्हा मोबाईल डेटा खूप महाग होता. संपूर्ण महिन्यासाठी फक्त एक किंवा 2GB डेटा उपलब्ध होता. त्यामुळे काही लोक मेसेज पाहिल्यानंतर किंवा एखादी छोटी फाईल डाऊनलोड केल्यानंतर लगेच डेटा बंद करायचे, पण जिओच्या आगमनाने सर्व काही बदलले. आजकाल, मोबाइल डेटा आणि कनेक्टिव्हिटीची गरज आहे. आजच्या डिजिटल युगात मनोरंजनापासून तर रोजच्या जीवनातील अनेक कामे ऑनलाइन झाली आहेत, टेलिकॉम कंपन्या नवीन आणि उत्तम रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. अशा परिस्थितीत Jio आणि Airtel दोघेही 1199 रुपयांचा खास प्लॅन ऑफर करत आहेत, पण प्रश्न असा आहे की तुमच्या गरजेनुसार दोन्हीपैकी कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे? चला जाणून घेऊया.
जिओ एअरटेल
जिओ एअरटेल
advertisement

एअरटेलचा 1199 रुपयांचा प्लॅन

डेटा: या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 210GB डेटा म्हणजेच 2.5GB डेटा दररोज मिळतो.

व्हॅलिडिटी: या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे.

कॉलिंग: यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळते.

एसएमएस: तुम्ही दररोज 100 मोफत एसएमएस पाठवू शकता.

OTT सबस्क्रिप्शन: एवढेच नाही, तर ॲमेझॉन प्राइमचे 3 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन आणि विंक म्युझिकचा फ्री अॅक्सेस मिळत आहे.

advertisement

Smartphoneचा कॅमेरा साफ करुन फोटो काढता? महागात पडेल ही चूक

इतर फीचर्स: तुम्हाला प्लॅनमध्ये एअरटेल सेफ पे आणि अँटी-व्हायरस प्रोटेक्शनसारखी अॅडिशनल सर्व्हिसेस देखील मिळत आहेत.

जिओचा 1199 रुपयांचा प्लॅन

डेटा: दुसरीकडे, Jio या प्लॅनमध्ये एकूण 252 GB डेटा देत आहे. म्हणजे दररोज 3GB डेटा, जो Airtel पेक्षा जास्त आहे.

advertisement

व्हॅलिडिटी: या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी देखील 84 दिवसांची आहे.

कॉलिंग: या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधाही मिळते.

SMS: तुम्ही दररोज 100 फ्री SMS पाठवू शकता.

OTT सबस्क्रिप्शन: Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud वर फ्री प्रवेश उपलब्ध आहे.

Instagram वर आपण लाइक केलेल्या पोस्ट कशा पाहायच्या? ही आहे ट्रिक

advertisement

तुमच्यासाठी कोणाचा प्लॅन बेस्ट आहे?

जास्त डेटा: तुमचा डेटा वापर जास्त असेल, जसे की व्हिडिओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग किंवा घरून काम, तर Jio चा 1199 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम ऑप्शन आहे.

OTT ॲप्स: त्याच वेळी, जर तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मचे वेड असेल, तर Amazon Prime सारख्या प्रीमियम सेवांसह Airtel चा Rs 1199 चा प्लान एक उत्तम ऑप्शन आहे.

advertisement

एकूणच, Jio आणि Airtel या दोन्ही प्लॅन्स त्यांच्या सेगमेंटमध्ये सर्वोत्तम आहेत. डेटा प्रेमींसाठी जिओ अधिक चांगले आहे. तर एअरटेल OTT आणि म्यूझिक अॅक्सेससाठी चांगले ऑफर देत आहे. त्यामुळे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार या दोनमधील बेस्ट प्लॅन निवडू शकता.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio, Airtel चे हे जबरदस्त प्लॅन ; Amazon Prime फ्री, डेटाही भरपूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल