Instagram वर आपण लाइक केलेल्या पोस्ट कशा पाहायच्या? ही आहे ट्रिक

Last Updated:

तुम्हालाही तुमच्या इन्स्टाग्रामवर आवडलेला किंवा पाहिला गेलेला कंटेंट पुन्हा पाहायचा असेल तर काळजी करू नका. यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही. याची एक ट्रिक आहे. जी आपण जाणून घेणार आहोत.

इंस्टाग्राम
इंस्टाग्राम
मुंबई : बऱ्याच वेळा तुम्ही इंस्टाग्रामवर रील पाहत असतात परंतु फीड सेव्ह किंवा शेअर करण्यापूर्वी ते रीफ्रेश होते. फीड रिफ्रेश होताच तो व्हिडिओही गायब होतो. त्यानंतर तो व्हिडिओ कसा शोधायचा, त्याचे नाव काय, विषय काय होता हेच समजत नाही, या विचारात वेळ जातो. पण आता तुम्हाला एवढी काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्ही तुमच्या लाईक-व्ह्यू केलेल्या सर्व पोस्ट्स आणि रील्स पाहू शकाल. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या Instagram च्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स देखील सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही एका क्षणात इंस्टाग्रामवर बरेच काही करू शकाल.
तुम्ही लाइक केलेले व्हिडिओ कसे पाहायचे?
तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या किंवा आवडलेल्या पोस्टबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही या ट्रिक फॉलो करू शकता. पण तुम्ही हे कसे कराल? यासाठी फक्त तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर जा, वरच्या राइट साइडला असलेल्या थ्री लाइनवर क्लिक करा. इथे तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसतील. थोडे खाली स्क्रोल केले तर My Activity चा ऑप्शन दिसेल.
advertisement
ॲक्टिव्हिटीज ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर लाइक्सवर क्लिक करा. येथे तुम्हाला सर्व कंटेंट वेगवेगळ्या कॅटेगिरीमध्ये दाखवले जातील. आता तुम्ही जो फोटो व्हिडिओ पाहू इच्छिता तो पुन्हा पाहू शकता.
सर्च हिस्ट्री कशी डिलीट करायची?
तुमची इंस्टाग्राम सर्च हिस्ट्री कोणीही पाहू नये असे तुम्हाला वाटत असेल तर ही ट्रिक उपयुक्त ठरेल. परंतु सर्च करताना, स्पेसिफिक अकाउंट सर्च प्रिडिक्शनमध्ये शो करु इच्छित नसाल तर तुम्ही तुमची सर्च हिस्ट्री क्लिअर करु शकता.
advertisement
यासाठी तुम्हाला इन्स्टाग्राम प्रोफाईलवर जावे लागेल, उजव्या कोपऱ्यात दाखवलेल्या तीन ओळींवर क्लिक करा, माय ॲक्टिव्हिटीजवर क्लिक करा, त्यानंतर Recent Search च्या ऑप्शनवर क्लिक करा, All in Recent Search वर क्लिक करा आणि Confirm या  ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमची सर्च हिस्ट्री क्लिअर होईल.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Instagram वर आपण लाइक केलेल्या पोस्ट कशा पाहायच्या? ही आहे ट्रिक
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement