खास गोष्ट म्हणजे Flipkart आणि Vivoच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या या फोन्सना SBI, DBS, IDFC First Bank, Yes Bank, Federal Bank आणि BOB कार्डद्वारे पेमेंट केल्यास ₹1,500 पर्यंतची इंस्टंट सूट देखील मिळत आहे. दोन्ही फोनच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
बंपर ऑफर! 50 हजारांहूनही स्वस्त मिळतोय iPhone 16, जाणून घ्या पूर्ण ऑफर
advertisement
Vivo Y31 ची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
विवो Y31 मध्ये 6.68 इंचाचा एचडी + एलसीडी स्क्रीन आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 निट्स ब्राइटनेससह येतो. हा फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर आणि Arm Mali-G57 MC2 GPUवर चालतो. यात 4GB किंवा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डने 2TB पर्यंत वाढवता येते.
त्याच्या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. IP68 आणि IP69 रेटिंगसह, हा फोन पाणी आणि धुळीपासून संरक्षित आहे.
पॉवरसाठी, यात 6,500mAh बॅटरी आहे आणि 44W फास्ट चार्जिंग दीर्घ बॅकअप देते. ग्राहक हा फोन रोझ रेड आणि डायमंड ग्रीन रंगांमध्ये खरेदी करू शकतात.
साडी ट्रेंड सोडा! आता आलाय तुमच्या बालरुपाला मिठी मारण्याचा ट्रेंड, असा करा
Vivo Y31 Pro ची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
Vivo Y31 Pro मध्ये 6.72-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,050 निट्स ब्राइटनेससह येतो. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसरवर बेस्ड आहे आणि तो Mali-G615 MC2 GPU ने सुसज्ज आहे.
यात 8GB RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज आहे. कॅमेरा सेटअप म्हणून, यात 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सर आहे, तर सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. ग्राहक हा फोन मोचा ब्राउन आणि ड्रीमी व्हाइट रंगांमध्ये खरेदी करू शकतात.
