Vi ची 180 दिवसांचा जबरदस्त प्लॅन
खरंतर, Vodafone Idea ने BSNL प्रमाणे 180 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची किंमत 1,749 रुपये आहे. चला जाणून घेऊया या खास योजनेचे फायदे...
Window की स्प्लिट AC, कोणती आहे बेस्ट? खरेदीपूर्वी अवश्य घ्या जाणून
अनलिमिटेड कॉलिंग: तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंगचा आनंद घेऊ शकता.
advertisement
हाय-स्पीड डेटा: या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा मिळत आहे.
फ्री SMS: या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 फ्री एसएमएसची सुविधाही मिळत आहे.
फ्री नॅशनल रोमिंग: एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये संपूर्ण भारतभर रोमिंगसाठी कोणतेही एक्स्ट्रा चार्ज लागणार नाही.
अनलिमिटेड नाईट डेटा: खास गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा मिळतो.
वीकेंड डेटा रोलओव्हर: प्लॅनमधील संपूर्ण आठवड्याचा उर्वरित डेटा आठवड्याच्या शेवटी वापरला जाऊ शकतो.
Nothing Phone (2a) च्या 256GB व्हेरिएंटची किंमत झाली कमी! वाचतील हजारो रुपये
BSNL सुद्धा खास प्लॅन ऑफर करत आहे
दुसरीकडे, BSNL देखील VI शी स्पर्धा करण्यासाठी एक विशेष योजना ऑफर करत आहे. या प्लॅनची किंमत 897 रुपये आहे. जी Vodafone Idea पेक्षा खूपच स्वस्त आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, 90GB हाय-स्पीड डेटा आणि 180 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज 100 फ्री एसएमएसची सुविधाही मिळत आहे. त्याच वेळी, Airtel आणि Jio कडे 180 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला कोणताही प्लॅन नाही.
या यूझर्ससाठी फायदेशीर
VI चा हा विशेष 180 दिवसांचा प्लॅन अशा यूझर्ससाठी फायदेशीर आहे ज्यांना डेली डेटासह दीर्घ व्हॅलिडिटी हवी आहे. तसंच, किंमतीच्या बाबतीत, बीएसएनएल प्लॅन अधिक परवडणारी आहे. Airtel आणि Jio कडे अशा योजना नाहीत ज्यामुळे Vi आणि BSNL ला फायदा होईल.
